आंबा महोत्सवाच्यानिमित्ताने मैदानाचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:25 AM2018-04-25T05:25:18+5:302018-04-25T05:25:18+5:30

ठाणे महापालिका हद्दीतील मोकळ्या मैदानांमध्ये लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्र म आणि विविध प्रदर्शन भरविण्यात येत होते.

On the occasion of the Mango Festival, the ground politics got hot | आंबा महोत्सवाच्यानिमित्ताने मैदानाचे राजकारण तापले

आंबा महोत्सवाच्यानिमित्ताने मैदानाचे राजकारण तापले

Next

ठाणे : शहरातील खेळाची मैदानेक्रीडा प्रकाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही महोत्सव अथवा इतर कार्यक्रमांसाठी देण्यात येऊ नयेत, असा ठराव महापालिकेच्या महासभेत झाला आहे. असे असतांनादेखील भाजप आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या आंबा महोत्सवासाठी मात्र गावदेवी मैदान खुले केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाणे महापालिका हद्दीतील मोकळ्या मैदानांमध्ये लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्र म आणि विविध प्रदर्शन भरविण्यात येत होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील गावदेवी मैदानांमध्ये अशीच काहीशी अवस्था होती. या कार्यक्र मांमुळे शहरातील मुलांना खेळापासून वंचीत रहावे लागत होते. तसेच काही खासगी संस्था नाममात्र भाडे भरून प्रदर्शनासाठी मैदान घेत होते आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून नफा मिळवित होत्या. ही बाब सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी उघड केल्यानंतर शहरातील सर्वच मैदानांमध्ये कार्यक्र मांना बंदी घातल्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर यापुढे केवळ क्रीडा आणि कला महोत्सवांसाठीच मैदान भाडेतत्त्वावर देण्याचा व अन्य कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य प्रयोजनांसाठी मैदानाचा वापर बंद करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले होते. असे असतानाच आमदार केळकर यांच्या आंबा महोत्सवासाठी महापालिकेने मैदान खुले करून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने गावदेवी मैदानात आंबा महोत्सव आयोजिला आहे. १ ते १० मे या कालावधीत तोहोणार आहे. आंबा महोत्सव आयोजित करणाया संस्कार संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमदार केळकर हे कार्यरत आहेत. तर कोकण विकास प्रतिष्ठान हे भाजपतील एका बड्या नेत्याशी संबंधित आहे. त्यामुळेच सत्तेवर असलेल्या नेत्यांची मर्जी राखण्यासाठीच महापालिकेने हा निर्णय घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

शेतमालाच्या विक्रीसाठी महापालिकांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे परिपत्रक आहे. त्यानुसारच यालादेखील परवानगी दिली आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

शेतकºयांसाठी हा महोत्सव आहे. हा इव्हेंट नसून शेतकरी येथे येऊन माल विकतात. मागील १३ वर्षे तो याच ठिकाणी भरविला जात आहे. त्यानुसारच पालिकेने ही परवानगी दिलेली आहे. यात विनाकारण राजकारण केले जात आहे. कृषी आणि पणन विभागही यात आहे.
- संजय केळकर, आमदार, ठाणे शहर

Web Title: On the occasion of the Mango Festival, the ground politics got hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा