विकासकाने अडविली रहिवाशांची वहिवाट; आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन देऊनही अधिकारी कारवाई करेनात

By अजित मांडके | Published: October 31, 2023 03:21 PM2023-10-31T15:21:51+5:302023-10-31T15:23:03+5:30

ठाणे : नौपाडा बी कॅबीन भागात मागील ४० ते ४५ वर्षे वास्तव्यास असलेल्या १ हजार लोकांची वहिवाटच एका विकासकाने ...

Occupancy of residents prevented by developer; | विकासकाने अडविली रहिवाशांची वहिवाट; आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन देऊनही अधिकारी कारवाई करेनात

विकासकाने अडविली रहिवाशांची वहिवाट; आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन देऊनही अधिकारी कारवाई करेनात

ठाणे : नौपाडा बी कॅबीन भागात मागील ४० ते ४५ वर्षे वास्तव्यास असलेल्या १ हजार लोकांची वहिवाटच एका विकासकाने जवळ जवळ बंद केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात येथील रहिवाशांनी ठाणे महापालिका आयुक्त, शहर विकास विभाग यांच्याकडून अभिप्राय घेतला असून त्यात संबधींत विकासकाने येथे बांधकाम करण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची परवानगी किंवा कंपुण घालण्याबाबत कोणत्याही स्वरुपाची परवानगी घेतली नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यानंतर आयुक्तांनी देखील नौपाडा प्रभाग समितीला येथील वहिवाट पुन्हा सुरु करण्याबाबत आदेश दिले असतांना देखील अद्यापही प्रभाग समितीकडून कारवाई करण्यात न आल्याने येथील दत्तप्रसाद सोसायटी, रुक्मीणी निवास आणि उतेकर चाळ मधील रहिवाशांनी आंदोलनची भुमिका घेतली आहे.

ठाणे महापालिका एकीकडे अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा फार्स करीत आहे. मात्र दुसरीकडे रहिवाशांच्या तक्रारी येऊनही कारवाई न करता विकासकाला झुकते माप देत असल्याचा प्रत्यय यातून दिसत आहे. बी कॅबीन भागात दत्तप्रसात सोसयटीमध्ये १६ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर रुक्मीणी निवासमध्ये १६ आणि उतेकर चाळीत २५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. याठिकाणी असलेला रस्ता थेट स्टेशन कडे जाणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज या रस्त्याचा वापर एक हजाराहून अधिक रहिवासी करीत आहेत. शिवाय दत्तप्रसाद सोसायटीला १९९३ मध्ये विकास आराखड्यातील प्लान प्रमाण २० फुट रस्ता असून हा रस्ता एक्सेस रोड म्हणून दाखविण्यात आला आहे. तसेच महापालिकेनेच या रस्त्याचे डांबरीकरण केले असल्याचे येथील रहिवासी सांगतात. परंतु मे महिन्यापासून येथील रस्ता एका विकासकाने बंद करण्याचा घाट घातला आहे.

याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे एक माणूस तेथून येऊ जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक असल्याचे दत्तप्रसाद चे चेअरमन देंवेद्र पुरोहीत यांनी सांगितले. त्यात एखाद्या वेळेस येथे काही हाणी झाली तर भविष्यात साधी रिक्षा किंवा रुग्णवाहीका देखील येथून जाऊ शकणार नाही? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे अनंत धनावडे यांनी सांगितले. त्यामुळे येथील रहिवाशांची वहिवाट मोकळी करुन द्यावी यासाठी येथील रहिवाशांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. तसेच शहर विकास विभागाकडून संबधींत विकासकाला परवानगी दिली आहे का? याचाही अहवाल मिळविला आहे. या अहवालात संबधींत विकासकाला येथे कोणत्याही स्वरुपाचे कुंपण घालण्याची परवानगी दिली नसल्याचे लेखी उत्तर रहिवाशांना दिले आहे. त्यानंतर आयुक्तांनी देखील संबधीत प्रभाग समितीला यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

परंतु तरी देखील अद्यापही या बांधकामावर कारवाई केली जात नसल्याने रहिवाशांनी आर्श्चय व्यक्त केले आहे. आयुक्तांच्या आदेशालाही प्रभाग समितीचे अधिकारी केराची टोपली दाखवित असल्याचेच यावरुन दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाई केली नाही तर सदनशीर मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा येथील रहिवाशांनी महापालिकेला दिला आहे.

Web Title: Occupancy of residents prevented by developer;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.