नगरसेविकेच्या पतीविरोधात अत्याचाराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:08 AM2020-03-04T01:08:09+5:302020-03-04T01:08:13+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नगरसेविकेचा पती तसेच दिराविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
मुंब्रा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नगरसेविकेचा पती तसेच दिराविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिराला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंब्य्रातील १६ वर्षांची पीडित मुलगी शुक्र वारी कौसा परिसरातील एका रु ग्णालयासमोर तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. त्यावेळी तिथे पोहोचलेल्या सईद अन्सारी याने तिला तू आमच्या मुलीला भडकावून घर सोडण्यास का प्रवृत्त करते, असे विचारु न तिचा विनयंभग केला. याबाबत पीडित मुलीने तक्र ार दाखल केल्याचे कळताच नगरसेविकेचा पती सरफराज अन्सारी उर्फबबली याने रविवारी ती घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये अडवून तक्रार मागे घेण्याची धमकी देऊन विनयंभग केल्याची तक्र ार तिने दाखल केली.
या तक्र ारीवरु न दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) तसेच इतर काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सईद याला अटक केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या लांडे करत आहेत.