बेकायदा रेती वाहतूकप्रकरणी एक अधिकारी, १२ कर्मचाऱ्यांच्या बदलीने पोलिसांत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:04 AM2020-09-29T00:04:50+5:302020-09-29T00:05:25+5:30

पालघर पोलीस अधीक्षकांची कारवाई : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश

An officer in the case of illegal sand transport, a commotion in the police with the transfer of 12 employees | बेकायदा रेती वाहतूकप्रकरणी एक अधिकारी, १२ कर्मचाऱ्यांच्या बदलीने पोलिसांत खळबळ

बेकायदा रेती वाहतूकप्रकरणी एक अधिकारी, १२ कर्मचाऱ्यांच्या बदलीने पोलिसांत खळबळ

Next

नालासोपारा : पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी खर्डी आणि खानिवडे रेतीबंदरावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सापळा रचून धाड मारली होती. या धाडीत १५२ सक्शन पंप, १६५० ब्रास रेती, २३० बोटी, १ जेसीबी असा ७ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांना दोषी मानून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे, तर मांडवी दूरक्षेत्रातील एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची बदली केल्याने पालघर पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

गुन्ह्यात जप्त केलेल्या २३० बोटी, १५२ सक्शन पंप यांची विल्हेवाट लावण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने महसूल विभागाने या ठिकाणचे सक्शन पंप आणि बोटी तोडण्याचे व गुन्ह्यात जप्त मुद्देमालाची, साहित्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन होत असल्याचे माहीत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असताना त्यांनी रेती माफियांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची बदली केली आहे. कर्तव्यात कसुरी केली म्हणून सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना तातडीने वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात सलग्न केले आहे. तसेच पोलीस हवालदार गौतम देवराम तोत्रे, पोलीस नाईक संतोष बाबू धांगडा, तानाजी अजिनाथ जाधव, सुभाष दादाराव शिंदे, भरत आत्माराम गोवारी, महेंद्र किसन पाटील, गजेंद्रसिंग बबनसिंग पाटील, विजय हिंदुराव गुरव, भूषण हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई नवनाथ दादा शेळके, गोविंद बळीराम मुसळे आणि उत्तम अमृत भोये यांचीही बदली करण्यात आली आहे.
 

Web Title: An officer in the case of illegal sand transport, a commotion in the police with the transfer of 12 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.