ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:56 AM2020-05-13T00:56:34+5:302020-05-13T00:59:50+5:30

ठाणे शहर नियंत्रण कक्षातील एका महिला अधिकाºयासह दोघांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतांनाच आता ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एका अधिकाºयालाही कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हयात आतापर्यंत ४० पोलीस कोरोनाग्रस्त झाले. त्यातील १९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

An officer of Thane Rural Police Control Room also contracted corona | ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण

ठाणे ग्रामीण पोलिसांमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे ग्रामीण पोलिसांमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकावआतापर्यंत सात अधिकाऱ्यांसह ४० पोलीस कोरोनाग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे ग्रामीण नियंत्रण कक्षातील एका पोलीस उपनिरीक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीण पोलीस दलातील हा पहिलाच कोरोनाग्रस्त अधिकारी असून त्याच्यावर ठाण्यातील होरायजन या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
वर्तकनगर भागात वास्तव्यास असलेल्या या अधिका-याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चार दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. ती रविवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना आता रुग्णालयात दाखल केले आहे. ठाणे ग्रामीणमधील ते एकमेव कोरोनाग्रस्त अधिकारी असले तरी जिल्हयात आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत सात अधिकारी आणि ३३ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील चार अधिकारी आणि १५ कर्मचा-यांनी या आजारावर मात केली आहे.

Web Title: An officer of Thane Rural Police Control Room also contracted corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.