‘त्या’ नगरसेवकांच्या संपर्कातील अधिकारी, सदस्यांची होणार चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 02:45 AM2020-05-29T02:45:40+5:302020-05-29T02:45:46+5:30
कळव्यातील नगरसेवक काही रुग्णांना कळवा रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठीही गेले होते.
ठाणे : ठाण्यातील ज्या दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे, ते अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.त्या सर्वांची तपासणी करणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.
कळव्यातील नगरसेवक काही रुग्णांना कळवा रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठीही गेले होते. तेथूनच त्यांना लागण झाली असावी असा संशय आहे. तसेच मदतीच्या माध्यमातून ते मागील काही दिवस अनेकांच्या संपर्कात होते. तर त्यांच्या कुटुंबियांची चाचणी केली आहे. परंतु, अद्याप त्यांचे अहवाल आलेले नाहीत.
तर कोपरीतील नगरसेवकदेखील अनेकांच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीलादेखील त्यांनी हजेरी लावली होती. ही बैठक तब्बल साडेआठ तास चालली होती. यावेळी त्याने काही मुद्दे कोरोनाबाबत उपस्थित केले होते. त्यावेळी त्यांना थकवा जाणवत होता, म्हणून विचारणा केली होती, अशी माहिती एका अधिकाºयाने दिली.