मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचा-यांना उपस्थितीची राहण्याची सक्ती, अन्यथा होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 01:27 PM2017-10-20T13:27:54+5:302017-10-20T15:28:05+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय.
मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय.
भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंह भुयारी मार्गाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाईंदर पश्चिम येथे येणार आहेत. वास्तविक आधी हा एकच कार्यक्रम घेण्यात आला होता. पण आज अचानक मीरारोड रेल्वे स्थानक परिसरच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपुजनचा कार्यक्रमदेखील घेण्यात आला आहे. भार्इंदर येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मीरारोडला जातील.
उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांनी पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना पत्र काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे. कार्यक्रमास उपस्थित न राहणारया अधिकारी - कर्मचारयांवर कारवाईचा इशारा म्हसाळ यांनी दिलाय. परंतु शुक्रवारी दिवाळीचा पाडवा हा महत्वाचा सण असून नंतर भाऊबीज आहे. शिवाय त्या दिवशी सुट्टी आहेच. सलग सुट्या असल्याने त्यातच मोठा सण असल्याने अनेक अधिकारी - कर्मचारी गावी वा नातेवाईकांकडे सहकुटुंब गेले आहेत. त्यातच सध्या एसटीचा संप पण आहे. त्यामुळे पालिकेने उपस्थित राहण्याची केलेली सक्ती अधिकारी व कर्मचा-यांना अडचणीची ठरली आहे. माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेनेच्या कामगार संघटनेचे अरुण कदम यांनी मात्र सणासुदीला कार्यक्रम घ्यायचा वरुन अधिकारी - कर्मचा-यांना सक्ती करणे निषेधार्ह असून नसती दांडगाई सहन केली जाणार नाही, असे सुनावले आहे.
वास्तविक मीरारोड स्थानक पारसिराचे सुशोभिकरणाचे बहुतांशी काम झालेले असून प्रवाशी त्याचा वापर आधीपासूनच करत आहेत. त्यामुळे पुन्हा सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपुजनचा कार्यक्रम पालिकेने ठेवल्याने आता तेथे सुद्धा उपस्थिती लावावी लागणार आहे.
पाली जेट्टी हायमास्टने उजळली
मीरारोड - पाली जेट्टी येथील परीसर अखेर हायमास्ट दिव्यांनी उजळून निघाला आहे. नगरसेवक असताना मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी पाली जेट्टीच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. जेट्टीचे दुस-या टप्प्याचे काम झाले असून किना-यावर काळोख असल्याने मच्छिमारांच्या सोयीसाठी डिमेलो यांनी हायमास्ट दिवे बसवण्याची मागणी केली होती.