डॉक्टरांसह अधिकारी - कर्मचाऱ्यांची ठाणे येथे ‘ रक्तदान ’ जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 04:05 PM2018-10-29T16:05:36+5:302018-10-29T16:11:01+5:30
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या श्री हरीश श्रीरामजी बागडे ,वैज्ञानिक अधिकारी रक्त पेढी विभागाच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेली ही रॅली जीपीओ मार्गे, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोर्ट नाका, सुभाष पथ, जांभळी नाका, टॉवर नाका, चिंतामणी चौक, अग्यारी लेन, टेंभी नाका, जैन मंदिर मार्गे पुन्हा सिव्हील रूग्णालयात
ठाणे : अपघातग्रस्तांसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रियानंतर रूग्णाना जीवदान देणा-या रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, रक्तदान करणा-यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी येथील सिव्हील रूग्णालयापासून रक्तदान जनजागृती रॅली सोमवारी सकाळी काढण्यात आली. यामध्ये डॉक्टरांसह, परिचारिका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी आणि रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या श्री हरीश श्रीरामजी बागडे ,वैज्ञानिक अधिकारी रक्त पेढी विभागाच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेली ही रॅली जीपीओ मार्गे, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोर्ट नाका, सुभाष पथ, जांभळी नाका, टॉवर नाका, चिंतामणी चौक, अग्यारी लेन, टेंभी नाका, जैन मंदिर मार्गे पुन्हा सिव्हील रूग्णालयात येथे येऊन थांबली. यानंतरही रूग्णालय प्रांगणात डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
सुमारे १०० ते १५० जणांच्या या रॅलीसाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची देखील खबरदारी घेतली. या वेळी रक्तदान - जीवदान अशा आशयाचे विविध पोस्टर, बॅनर घेऊन रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या घोषणा देत या रॅलीने ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात फिरून जनजागृती केली. रक्तपेढीतील रक्त साठा मोठ्याप्रमाणात वाढण्यात मदत व्हावी, यासाठी रक्तदात्यांनी स्वत: पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन या रॅलीव्दारे करण्यात आले. यावेळी रक्तदानाचे महत्व पटवून देणा-या घोषणा देत निघालेल्या डॉक्टरांची या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे रक्तदान करणा-या रक्तदात्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.