पदाधिकाऱ्यांनी बळकावली मोक्याची हॉटेल

By Admin | Published: February 3, 2017 03:14 AM2017-02-03T03:14:02+5:302017-02-03T03:14:02+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला

Officials managed to grab the hotel | पदाधिकाऱ्यांनी बळकावली मोक्याची हॉटेल

पदाधिकाऱ्यांनी बळकावली मोक्याची हॉटेल

googlenewsNext

- मुरलीधर भवार, डोंबिवली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक डोंबिवलीत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध हॉटेलमध्ये विचारणा केली असता साहित्यिक डोंबिवलीत दाखल झालेले नव्हते. मात्र, मोक्याची हॉटेल मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बळकावल्याचे दिसून आले.
संमेलनाला जवळपास २०० साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यातील काही साहित्यिकांची रसिकांनी ‘साहित्यिक आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत राहण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन आयोजकांनी केले होते. त्याला ३० पेक्षा जास्त रसिकांचा प्रतिसाद मिळाला.
आयोजकांनी सांगितले की, किमान १२० साहित्यिकांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. त्यासाठी आयोजकांनी हॉटेल सुयोग, विजयसागर, कुशाला आणि नंदी पॅलेस ही चार बडी हॉटेल्स बुक केली आहेत. त्यापैकी विजयसागर व कुशाला ही साहित्य संमेलनच्या पु.भा. भावे नगरीपासून बरीच दूर आहेत. तेथे चौकशी केली असता सायंकाळपर्यंत एकही साहित्यिक उतरलेले नाहीत. मात्र, आयोजकांनी रूम बुक केल्या आहेत, असे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. सुयोग व नंदीपॅलेस ही दोन्ही हॉटेल्स पु.भा. भावे साहित्यनगरीपासून तुलनेत जवळ आहेत. ‘सुयोग’मध्ये अखिल भारतीय महामंडळाच्या आठ सदस्यांचे सकाळी ११ वाजताच आगमन झाले. त्यांनी तेथे दुपारी विश्रांती घेतली, तर काही शहरात फेरफटका मारायला गेल्याची माहिती मिळाली. ‘नंदी पॅलेस’मध्ये महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी व अन्य तीन पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये साहित्यिकांचे वास्तव्य नसल्याने मोक्याची सुयोग व नंदी पॅलेस ही हॉटेल्स महामंडळाच्या सदस्य मंडळींनी बळकावली आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाच्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनास साहित्यिकांची उपस्थिती कमीच दिसून येणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे आयोजन डी. वाय. पाटील विद्यापीठाने केले होते. त्या संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांसाठी आयोजकांनी गाड्यांची व्यवस्था करण्याबरोबरच चांगले मानधनही दिले होते.

उपस्थिती कमी राहण्याची चिन्हे
आगरी युथ फोरमने पाच कोटींचा निधी जमवण्याची भीष्मगर्जना केली होती. परंतु, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहिता आड आली. त्यामुळे संमेलनाच्या खर्चास आपोआपच कात्री लागली. यायलाजायला गाडी नाही. मानधन मिळणार की नाही. स्वखुशीने मानधन परत केल्यास चांगले. जवळच्या साहित्यिकांनी मानधन घेऊ नये, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे साहित्यिकांची उपस्थिती कमीच असणार आहे.

Web Title: Officials managed to grab the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.