अंबरनाथमधील वाहतुक व्यवस्थेमध्ये नियोजन करण्यासाठी नगराध्यक्षांनी घेतली अधिका-यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 05:47 PM2017-12-12T17:47:03+5:302017-12-12T18:06:40+5:30
वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती.
अंबरनाथ -अंबरनाथ शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची गरज असल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी पोलीस, परिवहन आणि वाहतुक विभागाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक पालिकेत घेतली. या बैठकीत स्टेशन रोडवरील रिक्षा स्टँड आणि पार्किगची समस्या सोडविण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अंबरनाथ शहरात रस्ते रुंद झालेले असले तरी वाहतुक कोंडी आणि पार्किगची समस्या मात्र कायम आहे. त्यातच अधिकृत रिक्षा स्टँड नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी देखील वाढली आहे. या सर्वाचा फटका वाहन चालक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वाहतुक विभागाचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम विभागाचे पोलीस अधिकारी हजर होते. यावेळी मुळ समस्यांवर चर्चा झाल्यावर त्या सोडविण्यासाठी काय करावे यावर चर्चा करण्यात आली. पश्चिम भागातील स्टेशनला जोडणो महत्वाचे रस्ते सर्वात आधी सुरु करण्यावर निर्णय घेण्यात आला. तसेच स्टेशन रोडला समांरत जे रिक्षा स्टँड उभारण्यात आले आहे ते स्थलांतरीत करण्यावर ठोस निर्णय घेण्यात आला. अंबरनाथ पूर्व भागात बी केबीन रोडवर जे अनधिकृतपणो दोन रिक्षा स्टँड उभारण्यात आले आहे ते हनुमान मंदिराच्या पुढे स्थालांतरीत करण्यावर एकमत झाले. सोबत मुख्य स्टँडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यावर चर्चा करण्यात आली. या सोबत अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातील पार्किगची समस्या सोडविण्यासाठी सर्व वाहनचालकांना पालिकेच्या पार्किग विभागात गाडय़ा पार्क करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. शिवाजी चौकातील सर्व पार्किग चव्हाण नाटय़गृहाच्या तळमजल्यावर करण्यावर एकमत झाले. वाहतुक विभागाने देखील बेकायदेशिर पार्किगवर कारवाई करावी अशी सुचना वाळेकर यांनी केली.
अंबरनाथ पालिकेने वाहतुक व्यवस्थेत काय सुधारणा करता येतील यावर आधारीत प्रत्यक्षिक दाखविण्यात आले. वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यासाठी सर्व सुचना त्यामध्ये करण्यात आले आहे. मात्र या सभेत जे निर्णय घेण्यात आले आहे त्याची अमलबजावणी पालिका प्रशासन कधी करणार यावकडे सर्वाचे लक्ष लागुन राहिले आहे.