अधिकायांनी केली शौचालये स्वच्छ, सफाई कामगारांची स्वच्छतागृहे झाली लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:44 AM2017-10-03T00:44:41+5:302017-10-03T00:44:46+5:30

संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला.

 Officials said the toilets were clean and sanitary workers | अधिकायांनी केली शौचालये स्वच्छ, सफाई कामगारांची स्वच्छतागृहे झाली लख्ख

अधिकायांनी केली शौचालये स्वच्छ, सफाई कामगारांची स्वच्छतागृहे झाली लख्ख

googlenewsNext

ठाणे : संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला. एरव्ही, केवळ आदेश देणा-या पालिकेच्या अधिका-यांनी चक्क शौचालय साफ करण्याची जबाबदारी उचलल्याने सफाई कामगारांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. स्वच्छतेबरोबरच त्यांना दैनंदिन कामामध्ये येणा-या अडचणी समजून घेणे, हा मोहिमेचा हेतू होता.
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी तसेच सहायक आयुक्त मारु ती गायकवाड यांनी खारटन रोड येथील स्वत: १६ टॉयलेट सीट साफ केले. स्वच्छ अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील महत्त्वाची ठिकाणे साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यापुढे जाऊन आयुक्तांनी ही अनोखी संकल्पना मांडली. अशी ठिकाणे साफ झालीच पाहिजे. मात्र, शहरातील वस्ती आणि सार्वजनिक शौचालये साफ झाली, तर खºया अर्थाने सफाईचा उद्देश साध्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंब्य्रामध्ये बाबाजी पाटीलवाडी येथे दोन आठवड्यांपूर्वी अशी संकल्पना राबवली होती. त्यानंतर, सोमवारी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या खारटन रोड परिसरात सकाळी मोहीम राबवण्यात आली. खारटन रोड परिसर हा संपूर्ण सफाई कामगारांचा रहिवासी परिसर असल्याने या ठिकाणची निवड करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सफाई कर्मचाºयांना कोणत्या अडचणी येतात, त्या समजून घेण्यात आल्या. विशेषकरून या कर्मचाºयांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने कामे करण्यात अडचणी येत आहेत. तसेच जे पाणी मिळत आहे, त्यात काही प्रमाणात घातक रसायनाचे घटक असल्याचे अधिकाºयांच्या या वेळी लक्षात आले. या सर्व अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. अधिकाºयांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सफाई कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी स्वच्छता अभियानांतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव स्वच्छ करण्यात आला. सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेनेचे विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी श्रमदान करून संपूर्ण रायलादेवी तलाव आणि परिसर स्वच्छ केला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसेवकांनीही या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ठाणे महापालिका स्वच्छता अभियानांतर्गत प्रभाग-१२ मधील कचराळी तलाव परिसर व भोला भय्या चाळ, चंदनवाडी येथील परिसर खासदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे आदींनी स्वच्छ केला.

Web Title:  Officials said the toilets were clean and sanitary workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.