९३ हजार मतदारांची नावे वगळणार, माहिती घेण्यासाठी आजपासून अधिकारी घरोघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:30 AM2018-05-16T03:30:03+5:302018-05-16T03:30:03+5:30
ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीतून मयत,दुबार आणि स्थलांतरित अशी जवळपास ९२ हजार ४५४ एवढी नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीतून मयत,दुबार आणि स्थलांतरित अशी जवळपास ९२ हजार ४५४ एवढी नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तर, नव्याने तयार होणाऱ्या मतदार यादीमध्ये २०११ च्या जनगणनेनुसार १८ ते १९ वयोगटातील साडेतीन लाख तरूण मतदारांचा समावेश होणार आहे. तसेच आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक जानेवारी २०१९ च्या जन्मतारखेनुसार मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त स्वरूपात पूनर्परिक्षण मोहिम जिल्हा पातळीवर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १५ मे ते २० जून या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>नव्याने काही मतदानकेंद्रे उपलब्ध करण्याची गरज
सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण ५ हजार ६८१ मतदान केंद्र असून कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात ३५९ मतदान केंद्र आहेत. परंतु, ठाणे शहरात सुरू असणाºया रस्ता ंरूंदीकरणात अनेक मतदान केंद्र बाधित झाली असून त्याला पर्याय म्हणून महापालिका आयुक्तांना नवीन जागा मतदानकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्याविषयी सांगितले.
निवडणुकीची माहिती शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या माध्यमातून गोळा करण्यात येते. सध्या उन्हाळी सुटी असल्यामुळे शिक्षक रजेवर आहेत. त्यामुळे मुदत वाढवून देणे किंवा महापालिकेने त्यांचे कर्मचारी निवडणूक कामासाठी द्यावे, अशी विनंती निवडणूक आयोग
आणि स्थानिक महापालिका आयुक्तांना करण्यात येणार असल्याचेही मुकादम यांनी सांगितले.
४ जानेवारीला
अंतिम मतदारयादी
१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार यादी तर ३१ आॅक्टोबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून ४ जानेवारी २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम यादी तयार होईल,असेही मुकादम यांनी शेवटी सांगितले.