नाशिक-मुंबई महामार्गांवर ऑईल सांडल्यामुळे वाहतुकीस अडथळा; चालक रुग्णालयात दाखल
By सुरेश लोखंडे | Published: September 4, 2022 11:29 PM2022-09-04T23:29:28+5:302022-09-04T23:30:53+5:30
कंटेनरमधील ऑईल पुलावर पडल्याने येथील वाहतुकील अडथळा निर्माण झाला.
ठाणे : येथील खोपट जवळील विवियाना मॉल समोर नाशिक-मुंबई महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपूलावर कंटेनरवरील वाहन चालकांचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला आदळला. त्यामुळे कंटेनरमधील ऑईल पुलावर पडल्याने येथील वाहतुकील अडथळा निर्माण झाला. चालकांची ही समस्या सोडवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरमध्ये अडकलेला चालक जीतलाल पाल ( ५२) यास तत्काळ बाहेर काढून त्यांस कळवा रूग्णालयात दाखल केले. त्याच्या हाताला व पायाल गंभीर दुखापत झाली आहे.
रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत रस्त्यावरती ऑईल सांडले होते. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्घभवली. घटनेचे गांभीर्य ओळखून या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दोन कर्मचारी, पिकअप वाहन, बाईक ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाचे जवान, फायर वाहन, रेस्क्यु वाहन, राबोडी पोलीस कर्मचारी, राबोडी वाहतूक पोलीस कर्मचारी, क्रेन मशीन आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या अपघातग्रस्त कंटेनर मध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
राबोडी पोलीस कर्मचारी यांनी क्रेन मशिनच्या साह्याने अपघातग्रस्त कंटेनर व ट्रक रोडच्या बाजूला केले असून रस्त्यावरती सांडलेल्या ऑइल वरती आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांच्या मदतीने माती टाकण्यात आली आहे. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.