ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी हॉस्पीटलबाहेर तडफडून वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 03:26 PM2020-05-22T15:26:05+5:302020-05-22T15:26:57+5:30
वागळे इस्टेट भागातील वृध्दाचा रस्त्यात तडफडून झालेला मृत्युची घटना ताजी असतांनाच येथील श्रीनगर भागात आणखी एका ७० वर्षीय वृध्दाचा रुग्णालयाच्या बाहेर स्ट्रेचवरच मृत्यु झाल्याची सलग दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर आता टिकेची झोड उठविली जात आहे.
ठाणे : वागळे इस्टेट भागात एका वृध्दाचा रस्त्यावर तडफडून मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच येथील श्रीनगर भागात आणखी एका वृध्दाचा रुग्णालयाबाहेरील स्ट्रेचरवर तडफडून मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. ठाणे शहरातील कोरोना च्या रु ग्णांसाठी अॅम्ब्युलन्स व रु ग्णालयाची व्यवस्था करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे या दुसºया घटनेवरुन दिसून आले आहे. विशेष म्हणजे सदर रुग्णाला दोन दिवस झाल्यानंतरही जागे अभावी दाखल केले नव्हते. तर पाचपाखाडी येथील रु ग्णालयात आणल्यानंतर सामान्य की आयसीयू असा घोळ घालत उपचार न झाल्यामुळे वृद्धाला हॉस्पीटलबाहेर प्राण गमवावे लागले आहेत.
वागळे इस्टेट परिसरातील शांतीनगर येथे राहणाºया एका ७० वर्षांच्या वृद्धाची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलग दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांचा रिपोर्ट पॉझटिव्ह असल्यामुळे त्यांना रु ग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. पहिल्या दिवशी त्यांच्या मुलाने महापालिकेकडे अॅम्ब्युलन्स व रु ग्णालयाचे नाव देण्याची विनंती केली. मात्र, महापालिका प्रशासनाने काहीही कळविले नाही. त्यांच्या मुलाने थेट एका रु ग्णालयात संपर्क साधून वडिलांना दाखल करण्याची विनंती केली. मात्र, महापालिकेच्या डॉक्टरांनी फोन केल्याशिवाय आम्ही कोणालाही दाखल करून घेणार नाही, असे रु ग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी नगरसेवक नारायण पवार यांनी डॉ. कोर्डे यांच्याशी संपर्कसाधून, रु ग्णालयात वृद्धाला दाखल करण्याची देण्याची विनंती केली. अखेर पाचपाखाडी येथील एका रु ग्णालयात रात्री नऊच्या सुमारास सामान्य कक्षात जागा असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आल्यावर वृद्धाला तेथे नेण्यात आले. मात्र, त्याला लगेचच दाखल करून न घेतल्याने त्यांची प्रकृती बिघडत होती. काही काळानंतर तेथील डॉक्टरांनी या रु ग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. मात्र, आमच्याकडे आयसीयूत जागा शिल्लक नाही. त्यामुळे आम्ही त्याला दाखल करु शकत नाही. तुम्ही दुसºया हॉस्पीटलमध्ये चौकशी करा, असे त्यांच्या मुलाला सांगण्यात आले. या काळात उपचाराअभावी त्या रु ग्णाचा स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू झाला, असे नारायण पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अॅम्ब्युलन्सअभावी रु ग्णालयातून डिस्चार्ज थांबविले
महापालिका क्षेत्रात अॅम्ब्युलन्सची संख्या कमी असल्यामुळे कोरोनाच्या रु ग्णांची ने-आण करण्यात अडचणी येत आहेत. पाचपाखाडीतील एका रु ग्णालयात गुरुवारी दुपारी संपर्क साधला. त्यावेळी चार रु ग्णांचा डिस्चार्ज झाला होता. मात्र, ते महापालिकेची अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे रु ग्णालयात थांबले असल्याचे सांगण्यात आले. त्यांना खाजगी रु ग्णवाहिकांच्या चालकांकडून १० ते १५ हजार रु पये दर सांगण्यात आला होता. त्यामुळे नाईलाजास्तव सर्व रु ग्ण ताटकळत होते. पर्यायाने कोरोनाच्या अन्य रु ग्णांनाही दाखल केले जात नव्हते. त्यामुळे महापालिका व रु ग्णालय यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट होते. या परिस्थितीत संबंधित रु ग्णालयांच्या व्यवस्थापनांनाच अॅम्ब्युलन्सने रु ग्णांना घरी सोडण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
मनसेचे महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन
रुग्णवाहीके अभावी रस्त्यावर तडफडून होणारे मृत्यू, बेडची कमी असलेली संख्या, आणि पालिकेचा नियोजनशून्य कारभार या सर्वांचा निषेध म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आयुक्त विजय सिंघल यांच्या कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन केले. वागळे मध्ये एका ६० वर्षीय वृद्धाचा रु ग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यात तडफडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी देखील एका वृद्धाचा ठाण्यातील एकाचा अशाचप्रकारे मृत्यू झाला आहे. वारंवार प्रशासनाशी संपर्क साधूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आणि पालिकेचा कारभार देखील सुधारत नसल्याने प्रशासनाला जाब विचारण्यासाठी त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले.