भूलथापा देऊन वृद्धेला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:23+5:302021-06-16T04:52:23+5:30

ठाणे : कळवा येथील एका ७० वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन सोन्याच्या बांगड्यांसह ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज दोन भामट्यांनी ...

The old man was robbed by mistake | भूलथापा देऊन वृद्धेला लुबाडले

भूलथापा देऊन वृद्धेला लुबाडले

Next

ठाणे : कळवा येथील एका ७० वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन सोन्याच्या बांगड्यांसह ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज दोन भामट्यांनी लुबाडल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कळवा, टाकोली मोहल्ला येथे राहणारी ही वृद्ध महिला १३ जून रोजी दुपारी कळव्यातील उमरशाबाबा दर्गा येथील गल्लीतून जात होती. त्याचवेळी २० ते २५ वयोगटातील दोन अनोळखी भामटे तिथे आले. त्यांनी तिला सरदारजीला मुलगा झाला आहे, तो सामान वाटतो आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, एक हजार ८०० रुपयांची रोकड आणि मोबाईल पिशवीत ठेवतो, असे भासविले. मात्र, हातचलाखीने ते पिशवीमध्ये ठेवण्याऐवजी तिची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिते याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The old man was robbed by mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.