मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 07:51 AM2017-09-19T07:51:26+5:302017-09-19T07:54:26+5:30

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे.

old versova bridge mumbai ahmedabad highway will remain closed 5hours tuesday | मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

Next

मीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 


सकाळी 8 वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे.  तपासणीचे काम जवळपास 5 तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक नवीन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलीस व वाहतूक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतूक शाखेचे 18,  पालघर शाखेचे 22 तर महामार्ग वाहतूक शाखेचे 11 असे मिळून ५१ अधिकारी व कर्मचारी येथे तैनात केले जाणार आहेत. शिवाय पालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डनसुद्धा दिले जाणार आहेत. 

कुठल्या पद्धतीनं या पुलाची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस )चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याच्या काळात नवीन पुलावरुनच दोन्ही बाजूची वाहतुक सुरू होती. परंतु यामुळे काही तास वाहतूक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. 9 महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतून लहान तर एका मार्गिकेतून मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमित तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. नियमित तपासणीमध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळवण्यासाठी सांगण्यात आले आहे. दर वीस मिनिटांनी नवीन पुलावरुन एका एका बाजूची वाहनं सोडली जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली आहे. 

Web Title: old versova bridge mumbai ahmedabad highway will remain closed 5hours tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.