जुने साहित्य आताच्या काळाशी सुसंगत : किरण भिडे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:02 PM2019-07-11T17:02:59+5:302019-07-11T17:08:13+5:30

आचार्य अत्रे कट्ट्यावर जुन्या साहित्यावर किरण भिडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.

 Older literature is relevant now: Kiran Bhide | जुने साहित्य आताच्या काळाशी सुसंगत : किरण भिडे यांचे प्रतिपादन

जुने साहित्य आताच्या काळाशी सुसंगत : किरण भिडे यांचे प्रतिपादन

googlenewsNext
ठळक मुद्दे जुने साहित्य आताच्या काळाशी सुसंगत : किरण भिडेअत्रे कट्ट्यावर ‘जुने साहित्य, त्याचे संगोपन व आपण’ किरण भिडे यांनी साधला श्रोत्यांशी संवाद

ठाणे: जुन्या साहित्यात बरेचशे साहित्य असे आहेत की त्याचा आताच्या काळाशी संबंध आहे. काही संदर्भ बदलले तर ते आताचेच आहेत की काय असे वाटते असे मत उद्योजक आणि साहित्यप्रेमी किरण भिडे यांनी व्यक्त केले.  आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे बुधवारी अत्रे कट्ट्यावर ‘जुने साहित्य, त्याचे संगोपन व आपण’ याविषयावर भिडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.

          ते म्हणाले, जुन्या साहित्यात बरेचशे साहित्य असे आहेत की त्याचा आताच्या काळाशी संबंध आहे. काही संदर्भ बदलले तर ते आताचेच आहेत की काय असे वाटते. ‘आनंद’ हे लहान मुलांचे मासिक पुर्वीच्या काळात निघत. मग नंतर ते पालक आणि शिक्षकांसाठी सुरू करण्यात आले. गोपीनाथ तळवळकर नियमीत त्यात लिहीत असत. १९३७ साली निवडणूका झाल्या, त्या निवडणूकांवर लिहीलेला लेख हा आताच्या काळाशी सुसंगत आहे. अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ सिनेमा आला त्यातील अक्षय कुमारच्या भूमिकेचे आताच्या काळात कौतुक होत आहे. १८६८ साली लिहीलेला रजस्वला - स्त्रीयांचे प्रश्न हा लेख मिळाला, या लेखात स्त्रीयांच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला आहे. या लेखाचे त्या काळात खुप कौतुक असायला हवे होते. महिला क्रिकेटला आता चांगले दिवस आले आहेत. शिरीष कणेकरांनी महिला क्रिकेटवर १९६३ साली लेख लिहीला होता असे अनेक संदर्भ त्यांनी दिले. बहुविध डिजीटल मीडियावर आम्ही जुन्या लेखांचे डाक्युमेंटेशन करीत आहोत. ४०० हून जास्त लेखांचे आम्ही डाक्युमेंटेशन केले आहे. ज्यांच्याकडे जुने लेख असतील त्यांनी ते आमच्याकडे पाठवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बहुविध डॉट कामवर असलेला दिर्घा या विभागात जुन्या नियतकालिकांमधले चिंतनपर, ऐतिहासिक विषयांवरचे, वैचारिक मंथनाला चालना देणारे, परिघाबाहेरचे अनुभव जीवंत करणारे दीर्घ लेख, कधी इतिहासातील अपरिचित पैलूंचा धांडोळा घेणारे कधी स्मरणरंजनाची जादू अनुभवता येणारे तर कधी वर्तमान काळाशी सुसंगत वाटावे असे भूतकाळातील लेख वाचताना तुम्हाला कदाचित लेखनाची प्रेरणाही मिळू शकते असे भिडे म्हणाले.

Web Title:  Older literature is relevant now: Kiran Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.