ओमकार इंटरनॅशनल, विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जाणले ‘आई’चे महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 07:21 PM2017-11-14T19:21:53+5:302017-11-14T19:25:28+5:30

जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई, प्रत्येक पाल्याचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी चुकांवर पांघरुण तर पुन्हा असे उपद्रवी कृत्य होऊ नये यासाठी कठोर शासन करणारी आई अशी आईची एक ना अनेक रुप दैनंदिन जीवनात प्रत्येक अबालवृद्धाला स्मरणात असतात. जन्मदात्या मातेला आई तर आपण ज्या देशात राहतो त्याला मातृभूमी म्हणतो. त्या आईचे महत्व श्यामची आई च्या माध्यमातुन साने गुरुजींनी शंभर वर्षापूर्वी सांगितले होते. त्याच्या शतकोत्तर स्मृती वर्षानिमित्त डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘आई नावाचा देव’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Omkar International, Vidyaniketan's students realized the importance of 'I' | ओमकार इंटरनॅशनल, विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जाणले ‘आई’चे महत्व

ओमकार इंटरनॅशनल, विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जाणले ‘आई’चे महत्व

Next
ठळक मुद्दे श्यामची आई स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आयोजन

डोंबिवली: जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई, प्रत्येक पाल्याचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी चुकांवर पांघरुण तर पुन्हा असे उपद्रवी कृत्य होऊ नये यासाठी कठोर शासन करणारी आई अशी आईची एक ना अनेक रुप दैनंदिन जीवनात प्रत्येक अबालवृद्धाला स्मरणात असतात. जन्मदात्या मातेला आई तर आपण ज्या देशात राहतो त्याला मातृभूमी म्हणतो. त्या आईचे महत्व श्यामची आई च्या माध्यमातुन साने गुरुजींनी शंभर वर्षापूर्वी सांगितले होते. त्याच्या शतकोत्तर स्मृती वर्षानिमित्त डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘आई नावाचा देव’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.
सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात मंगळवारी संपन्न झालेल्या या उपक्रमात ओमकार इंटरनॅशनल, आणि विद्यानिकेतन शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांनी आईचे महत्व जाणले. प्रख्यात निवेदनकार मिलिंद कुलकर्णी यांनी मातेचे महत्व विषद करत विद्यार्थ्यांना बोलते केले. या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आई वर लिहिलेल्या कविता सादर केल्या. कवी फ.मु.शिंदे, कुसुमाग्रज यांच्यासह विविध साहित्यिकांच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा देण्यात आला. विठू माऊली तू, माझी रेणूका माऊली, आई भवानी तुझ्या कृपेने, वंदे मातरम्, आई जगदंबे जातो, जयोस्तुते, जयदेव जयदेव जयजय शिवराया, हे हिंदू नृसिंहा, सागरा प्राण तळमळला, ए वतन ए वतन, मेरा रंग दे बसंती चोला, तुु कितनी अच्छी है, ये तो सच है की भगवान है, अरे खोप्यामधी खोपा, निंबोणीच्या झाडामागे, ए आई मला पावसात भिजू दे, आई भवानी तुझ्या कृपेने, आणि माँ तुझे सलाम यांसारख्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना हा उपक्रम जास्त भावला. उपस्थित विद्यार्थ्यांना राज्यमंत्री चव्हाण, ओमकार शाळेच्या संस्थापिका दर्शना सामंत, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, अमित कासार, प्रभु कापसे आदींनी शुभेच्छा देत राष्ट्रप्रेम जागृत ठेवा असे आवाहन केले. स्वा. सावरकरांसह शहिद भगतसिंग, चाफेकर बंधू यांसह विविध स्वातंत्र्य विरांना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर व्यक्त करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत राष्ट्रप्रेम व्यक्त केले.
 

Web Title: Omkar International, Vidyaniketan's students realized the importance of 'I'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.