अभियंता दिनाच्यादिवशीच आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By पंकज पाटील | Published: September 15, 2022 06:11 PM2022-09-15T18:11:04+5:302022-09-15T18:13:57+5:30

अंबरनाथ शहरातील महत्त्वाकांशी प्रकल्प आणि काही रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालिका सभागृहात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते.

On the day of Engineer's Day, the MLAs slams officers in ambernath | अभियंता दिनाच्यादिवशीच आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अभियंता दिनाच्यादिवशीच आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next

अंबरनाथ - देशात एकीकडे अभियंता दिन साजरा होत असतानाच दुसरीकडे अंबरनाथमध्ये आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी पालिकेत येऊन अभियंत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. शहरातील रखडलेले प्रकल्प आणि समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार किणीकर आज अंबरनाथ पालिकेत आले होते. यावेळी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.   

अंबरनाथ शहरातील महत्त्वाकांशी प्रकल्प आणि काही रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालिका सभागृहात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. आमदारांच्या बैठकीला पालिकेतील सर्व प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीच्या पटलावरील प्रत्येक एका विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील कल्याण बदलापूर रस्ता हा वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने याबाबत आमदार किणीकर यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तसेच याच राज्य महामार्गावर जीर्ण झालेले पेवर ब्लॉक काढून त्या ठिकाणी नवीन पेवर ब्लॉक बसवण्याच्या सूचना देखील दिल्या. यानंतर अंबरनाथ शहरात नव्याने पूर्व आणि पश्चिम भागात सॅटिस प्रकल्प राबवण्याबाबत जो प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, त्या प्रस्तावात अनेक त्रुटी असून त्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना किणीकर यांनी प्रशासनाला दिल्या. 

एवढेच नव्हे तर सॅटिस प्रकल्प राबवत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या यशवंतराव नाट्यगृहाच्या अर्धवट अवस्थेतील पार्किंग प्लॉटचा देखील विकास या प्रकल्पांतर्गत करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अपुरी पडणार असल्याने पूर्व आणि पश्चिम भागात सॅटिस प्रकल्प अंतर्गत बहुमजली पार्किंग झोन प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हा आराखडा बदलत असताना त्यासाठी लागणारा वाढीव निधी शासनाकडून मंजूर करून घेतला जाईल असे किणीकर यांनी स्पष्ट केले. 

अधिकाऱ्यांना अपशब्द वापरले

या बैठकीत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते, त्यांनी पालिका प्रशासनाला लक्ष देण्याच्या सूचना दिल्या, मात्र या सूचना देत असताना अंबरनाथ नगरपालिकेतील एका माजी नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत असताना रागाच्या भरात त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना उद्देशून काही अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.

Web Title: On the day of Engineer's Day, the MLAs slams officers in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.