श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पटना साहेब स्थानकावर रेल्वे गाड्यांना २ मिनिटांचा थांबा 

By अनिकेत घमंडी | Published: January 9, 2024 06:37 PM2024-01-09T18:37:05+5:302024-01-09T18:37:22+5:30

Dombivali: श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या ३५५ व्या जयंतीनिमित्त अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मंगळवारपासून २३ जानेवारीपर्यंतच्या कालावधीसाठी पटना साहेब स्थानकावर रेल्वेने २ मिनिटांसाठी तात्पुरते थांबे देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला.

On the occasion of Shri Guru Gobind Singh Ji Maharaj's birth anniversary, 2 minutes halt of trains at Patna Saheb station | श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पटना साहेब स्थानकावर रेल्वे गाड्यांना २ मिनिटांचा थांबा 

श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पटना साहेब स्थानकावर रेल्वे गाड्यांना २ मिनिटांचा थांबा 

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली - श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या ३५५ व्या जयंतीनिमित्त अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मंगळवारपासून २३ जानेवारीपर्यंतच्या कालावधीसाठी पटना साहेब स्थानकावर रेल्वेने २ मिनिटांसाठी तात्पुरते थांबे देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला.

खालील तपशिलानुसार खालील गाड्या पटना साहेब येथे पोहोचतील/ सुटतील:
१२३६१ आसनसोल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस ०.०५ वाजता पोहोचेल आणि ०.०७ वाजता सुटेल.
१२३६२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल साप्ताहिक एक्सप्रेस दु.२:०२ वाजता पोहोचेल आणि दुपारी २:०४ वाजता सुटेल.
१२५४५ रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी साप्ताहिक एक्सप्रेस ००.०५ वाजता पोहोचेल आणि ००.०७ वाजता सुटेल.
१२५४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल कर्मभूमी साप्ताहिक एक्सप्रेस रात्री १०:४७ वाजता पोहोचेल आणि १०:४९ वाजता सुटेल.
२२९४८ भागलपुर-सुरत द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ११.०० वाजता पोहोचेल आणि ११.०२ वाजता सुटेल.
२२९४७ सुरत-भागलपुर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दुपारी १.२६ वाजता पोहोचेल आणि दुपारी १.२८ वाजता सुटेल असे रेल्वेने जाहीर।केले.

Web Title: On the occasion of Shri Guru Gobind Singh Ji Maharaj's birth anniversary, 2 minutes halt of trains at Patna Saheb station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.