उल्हासनगरात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीकडून मंत्री सत्तार यांच्या विरोधात आंदोलन
By सदानंद नाईक | Published: November 8, 2022 06:12 PM2022-11-08T18:12:05+5:302022-11-08T18:12:58+5:30
उल्हासनगरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता कॅम्प नं-३ येथील नेहरू चौकात शहराध्यक्ष पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे याच्या बाबत काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ आंदोलन केले.
उल्हासनगर - राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ शहरातील नेताजी चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी पक्षाचे नेते प्रमोद हिंदुराव, सोनिया धामी कौर, प्रवीण खरात, भारत गंगोत्री यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता कॅम्प नं-३ येथील नेहरू चौकात शहराध्यक्ष पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे याच्या बाबत काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या उपस्थितीत नेताजी चौकात मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी मंत्री यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
भारत गंगोत्री, सोनिया धामी कौर, प्रवीण खरात, विकास खरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रमोद हिंदुराव व भारत गंगोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. सत्तार यांच्या बेताल वक्तव्यामुळे शिंदे सरकारचे नाव राज्यात नव्हेतर देशात बदनाम होत असल्याची प्रतिक्रिया गंगोत्री यांनी दिली. या आंदोलनाने शहरात राष्ट्रवादी पक्षात कलानी व गंगोत्री गट असल्याची चर्चा सुरू झाली आहे.