कामावर जाताना कार आली काळ बनून; दुचाकीला उडविले; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 08:31 AM2023-05-26T08:31:25+5:302023-05-26T08:31:37+5:30

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथील सूत्रकार फाट्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर भरधाव कारने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

On the way to work, the car arrived late; flew the bike; Three people died in a terrible accident | कामावर जाताना कार आली काळ बनून; दुचाकीला उडविले; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

कामावर जाताना कार आली काळ बनून; दुचाकीला उडविले; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरीजवळ गुरुवारी सकाळी  कार आणि मोटारसायकल यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही तरुण नाशिकमधील सरसूल- बारीमाळ येथील राहणारे आदिवासी तरुण आहेत. याबाबत तलासरी पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथील सूत्रकार फाट्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर भरधाव कारने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. 

कारचालकावर गुन्हा दाखल
संजान येथील कंपनीत कामाला जात असताना भीषण अपघात होऊन या तिघा तरुणांचा मृत्यू झाला. त्या तिन्ही तरुणांचे मृतदेह तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पंचनामा करून  तलासरी पोलिस ठाण्यात भरधाव वेगाने इर्टिगा कार चालविणाऱ्या चालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: On the way to work, the car arrived late; flew the bike; Three people died in a terrible accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात