पुन्हा एकदा बहरला ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्टा, ज्येष्ठांनी दिला जुन्या गाण्यांना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:48 PM2019-05-18T16:48:11+5:302019-05-18T16:50:26+5:30
संगीतातील जादू इतकी मोठी आहे कि त्यातून मिळणारी मन:शांती व समाधान काही वेगळीच असते अशाच समाधानासाठी जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्याची निर्मिती किरण नाकती यांनी केली.
ठाणे: ९२ वर्षीय भाटे काका व ८२ वर्षीय भालेराव काका या दोन्ही ज्येष्ठ गायकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
अभीर गुलाल उधळीत विठू माऊलीचा गजर करीत दिलीप नारखेडे यांच्या आवाजाने संगीत कट्ट्याची सुरुवात झाली. या कट्ट्याचे वैशिष्ट्य ठरले ते वसंत पारु ंडेकर या दिव्यांग गायकांनी सादर केलेले ‘कैवध्याच्या चांदण्याचा’ हे गीत. त्यांच्या या गायनाला उपस्थितांनी टाळ््याची दाद दिली.
शरद भालेराव यांनी ‘सवाबाईचा जोगवा’, प्रभाकर केळकर यांनी ‘जिक्र होता हे जब कयामत का’, विजया केळकर यांनी ‘ओ बसंती पावन पागल’, माधवी जोशी यांचे नाट्यगीत, वासुदेव फणसे यांनी ‘चाहुंगा मै तुझे’, प्रगती पोवळे यांनी ‘मेरे सपनो मे आना’, भाटे काका व संदीप गुप्ता यांनी ‘हमे और जिने कि चाहत ना होती’, संजय देशपांडे यांनी ‘बेकरार करके हमे यु ना’, मोरेश्वर ब्राह्मणे यांनी ‘आया है मुझे फिर याद वो जालीम’ ही गाणी आपल्या उत्स्फुर्त आवाजात सादर केली. तसेच विश्वास मुतालिक यांनी ‘अभंग’, सुधाकर कुलकर्णी यांनी ‘मेरा दिल भी कितना पागल’, व्यंकटेश कुलकर्णी यांनी ‘ओ रे ताल मिले के जल’, अविनाश भराटे यांनी ‘मैने चांद और सितारो की’, विष्णु डाकवाले यांनी ‘जाने कहा गये वो दिन’, विश्वनाथ कानासकर यांनी ‘सुहानी रात ढल चूकी’, प्रभात कुलकर्णी यांनी ‘आकाशी झेप घे रे’, अशोक गिरीं यांनी ‘पल पल दिल के पास’, सुहास चांदेकर यांनी रिमझिम गिरे सावन, विवेक जाधव यांनी छु लेने दो नाजुक ओठो को, सुप्रिया पाटील यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’, कीर्ती जोशी यांनी ‘येऊ कशी कशी मी नांदायला’, तेजराव पंडागळे यांनी ‘वाजवलेली बासरी’, अदिती पावसकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे’ या गाण्यांनी तर रंगत आणली. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या संपुर्ण ताकदीने गाणी सादर करीत होते. या कट्ट्याचे नियोजन आणि सुरेख व्यवस्था तसेच, कट्ट्यामागची किरण नाकती यांची नि:स्वार्थ भावन यांमुळेच संगीत कट्ट्याची आम्हाला ओढ असते अशा भावना या ज्येष्ठ गायकांनी व्यक्त केल्या. बोरिवली, डोंबिवली तसेच ठाणे शहरातील विविध भागांतील एकूण २८ गायकांनी आपली गायन कला सादर केली. या संगीत कट्ट्याचे निवेदन आदित्य नाकती याने केले. आम्हाला या कट्ट्यावर इतका आनंद मिळतोय की, आम्हाला असलेल्या आजारावर सुद्धा या गाण्यामुळे मात करता येते. हा संगीत कट्टा आमचे आयुष्य वाढवणारा ठरतोय असे मत गीतांजली बापट या ज्येष्ठ रसिकांनी दिली.