दीड वर्षात दिव्यात ५१ रेल्वे अपघात,४२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:50 AM2018-06-25T00:50:45+5:302018-06-25T00:50:48+5:30
दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले.
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले. मृतांमध्ये कानात एअरफोन घालून रेल्वे लाइन क्रॉसिंग करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.
व्यात स्वस्तात मिळणाºया घरांमुळे आणि दिवा हे जंक्शन असल्याने नागरिकांची पसंती दिव्याला मिळत आहे. त्यामुळे दिव्याचे झपाट्याने नागरीकरण होत, लोकसंख्या वाढत आहे. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोकलशिवाय पर्याय नसल्याने कळत नकळत त्याचा परिणाम लोकलवर होत आहे. यातून दीड वर्षात दिवा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना असे एकूण ५१ रेल्वे अपघात झाले आहेत.
२०१७ या वर्षभरात ४० अपघातांची नोंद असून, त्यामध्ये २२ जणांचा मृत झाला आहे. तर १८ जण जखमी झाले होते. तसेच २०१८ मध्ये जानेवारी ते जूनमध्ये ११ अपघात झाले आहे. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवा रेल्वे स्थानकात उतरलेले प्रवासी जाण्यासाठी पाद्चारी पूल असताना, त्याचा वापर न करता आपला जीव धोक्यात घालून रेल्वे लाईन क्रॉस करतात. एखादी लोकल आल्यानंतर जणू लोंढाच्या लोंढा रेल्वे रुळ ओलांडतात. त्यातील बहुसंख्य प्रवासी कानात इअर फोन लावून असतात.
त्यातून क्रॉसिंग करताना, अपघात होण्याची शक्यता असून, ती एक चिंतेची बाब असल्याचे रेल्वे सूत्रांने सांगितले.