वायूगळतीप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:59 AM2017-07-21T02:59:55+5:302017-07-21T02:59:55+5:30
पूर्वेकडील टिन्स वर्ल्ड या शाळेजवळ मंगळवारी रात्री विषारी रसायनांची ११ पिंपे अनिधकृत पणे टाकणाऱ्या टेम्पोच्या चालकाला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : पूर्वेकडील टिन्स वर्ल्ड या शाळेजवळ मंगळवारी रात्री विषारी रसायनांची ११ पिंपे अनिधकृत पणे टाकणाऱ्या टेम्पोच्या चालकाला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याने दिलेल्या माहिती नुसार एका रासायनिक कंपनीच्या व्यवस्थापकाला चौकशी करीता ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारच्या गंभीर घटनेचा तपास करता गोपनीय सूत्रा द्वारे माहिती मिळवून प्रथम ज्या टेम्पोच्या चालकाने ती पिंप नेऊन टाकली त्या रमेश झा याला प्रथम ताब्यात घेऊन चौकशी केल्या नंतर त्याच्यावर पर्यावरण रक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
तर त्या चालकाने दिलेल्या माहिती नंतर मोल्ड्स लॅब च्या व्यवस्थापकाला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे तर सदर विषारी रसायनाची पिंपे उघड्यावर टाकण्यास मदत करणाऱ्या एका भंगारवाल्याच्या व त्याच्या साथी दाराच्या शोधात तसेच या घटनेत जो टेम्पो वापरण्यात आला होता त्या टेम्पोचाही शोध बोईसर पोलीस घेत आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास चौफेर आणि योग्य दिशेने सुरू असून चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल
- विजय शिंदे , पोलीस निरीक्षक
बोईसर पोलीस स्थानक