गोध्रा हत्याकांडातील एकास अटक

By admin | Published: January 26, 2016 01:49 AM2016-01-26T01:49:41+5:302016-01-26T01:49:41+5:30

गुजरातमध्ये सन २००२मध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडातील एक संशयीत आरोपी अबरार पठाण (४८) रा. उत्तरप्रदेश याला गुजरातच्या अहमदाबाद दहशतवादी विरोधी

One arrested in Godhra killings | गोध्रा हत्याकांडातील एकास अटक

गोध्रा हत्याकांडातील एकास अटक

Next

पालघर : गुजरातमध्ये सन २००२मध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडातील एक संशयीत आरोपी अबरार पठाण (४८) रा. उत्तरप्रदेश याला गुजरातच्या अहमदाबाद दहशतवादी विरोधी पथकाने पालघरमधून अटक केली आहे. पालघरमधील युपी गोल्डन ट्रान्सपोर्ट या मुंबई महाराष्ट्रातील वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये आरोपी अबरार हा मागील सहा वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून कामाला होता. गुजरातमध्ये २००२मध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडातील तो संशयीत आरोपी होता. गुजरात दहतवादी विरोधी पथक अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. शनिवारी (२३ जानेवारी) आरोपी अबरार हा सिडको औद्योगिक वसाहतीमधील ड्युरिअन या लाकडी फर्निचर बनविणाऱ्या कंपनीमधील माल आपल्या ट्रकमध्ये भरीत असताना अहमदाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. उत्तरप्रदेश राज्यातील वाराणशीजवळील पिंडासे गावातील हा आरोपी अनेक वर्षांपासून पालघरमध्ये एकटाच राहत होता. उत्तरप्रदेशचे गाडी चालविण्याचे लायसन्स असल्याने आपण खूप गरीब असल्याने आपल्याला नोकरीची गरज असल्याचे खोटे सांगून मालकाचा विश्वास संपादन करून त्याने ही नोकरी मिळविली होती. अत्यंत मितभाषीक व आपले काम चोखपणे बजावीत असल्याने अबरारने मालकांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्याचा कुणीही संशय घेतला नव्हता. आरोपी अबरार याचा मोठा भाऊ अस्लम पठाण यालाही सन २००३ मध्ये विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिले.

Web Title: One arrested in Godhra killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.