पाच लाखाच्या खंडणीसाठी निर्घुण हत्या करणाऱ्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:48 PM2018-11-02T15:48:03+5:302018-11-02T15:56:10+5:30
भिवंडी : शहरात धामणकरनाका विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानांतून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसानंतर आज शुक्रवार रोजी सकाळी ...
भिवंडी: शहरात धामणकरनाका विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानांतून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसानंतर आज शुक्रवार रोजी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गालगत पाईपलाईनच्या अडगळीत मिळाला.या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असुन या प्रकरणी पोलीसांनी अकास अटक केली आहे.
बिलाल शकील कुरेशी(१४) असे अल्पवयीन मुलाचे नांव असुन तो निजामपूर मधील कुरेशीनगर मध्ये आपल्या आईवडीलांसोबत रहात होता. तो गेल्या रविवारी सकाळी आपल्या वडीलांसोबत धामणकरनाका माधवनगर मधील बीफच्या दुकानात आला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानकपणे तो दुकानातून अचानक गायब झाल्याने बिलालची शोधाशोध सुरू झाली. तो कोठेही न सापडल्याने त्याच्या वडीलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात बिलाल याचे अपहरण झाल्याची तक्रार केली.दरम्यान त्याच्या वडीलांना मोबाईलवरून पाच लाखाची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलीसांना दिली. त्याप्रमाणे पोलीसांनी तपास सुरू होता. काल रात्री दरम्यान बिलालची हत्या झाल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला असता मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईन लगत अडगळीत बिलालचा मृतदेह आढळून आला. सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत पाठविण्यात आला आहे. त्याच्या गळ्याला रस्सी आवळून डोक्यात दगड घालून त्यास जीवे ठार मारल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी तपास करून वाहीद अन्सारी(२०)या तरूणांस अटक केले असुन दुसरा अल्पवयीन आरोपी आपल्या कुटूंबासह शहरातून पळून गेल्याची माहिती सुत्राकडून मिळते.त्याच्या मागावर पोलीस असुन त्यास लवकरच पकडण्यात येईल,अशी माहिती पोलीसांनी दिली. या घटनेने शहरात खळबळ माजली असुन पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.