भिवंडीत अडीच लाखाच्या एमडीसह एकाला अटक
By नितीन पंडित | Updated: July 18, 2024 19:49 IST2024-07-18T19:49:22+5:302024-07-18T19:49:55+5:30
मोहम्मद साबीर शाह मोहम्मद खान वय ४२ वर्ष रा. धामणकर नाका असे अवैध एमडी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे...

भिवंडीत अडीच लाखाच्या एमडीसह एकाला अटक
भिवंडी: शहरात अवैध अमली पदार्थ साठवणूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असून शहरात २ लाख ६६ हजार रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमास भोईवाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.
मोहम्मद साबीर शाह मोहम्मद खान वय ४२ वर्ष रा. धामणकर नाका असे अवैध एमडी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी सोनी कंपाऊंड भिवंडी येथे एमडी हा अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची खबर भोईवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून सोनी कंपाऊंड परिसरातून मोहम्मद साबीर शहा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा अवैध एमडी जप्त केला.
ha