काँग्रेस,अपक्षाकडे प्रत्येकी एक समिती
By admin | Published: August 7, 2015 11:00 PM2015-08-07T23:00:31+5:302015-08-07T23:00:31+5:30
महापालिका विशेष समिती सभापती पदाच्या निवडणूका शुक्रवारी झाल्या. ९ पैकी ८ समिती सभापतीची निवड बिनविरोध झाली आहे. तर एका जागी अपक्ष नगरसेवक
उल्हासनगर : महापालिका विशेष समिती सभापती पदाच्या निवडणूका शुक्रवारी झाल्या. ९ पैकी ८ समिती सभापतीची निवड बिनविरोध झाली आहे. तर एका जागी अपक्ष नगरसेवक सुजितकुमार चक्रवर्ती यांनी काँग्रेस-राष्ट्वादीच्या पाठींब्यावर बाजी मारली आहे. शिवसेनेकडे-४ तर भाजपा-३, कॉग्रेस-१ व अपक्ष-१ अशी समिती सभापती पदे गेली आहेत.
उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी सेना-भाजपा व रिपाई महायुतीतून साई पक्ष बाहेर पडल्याने सत्ताधारी पक्ष अल्पमतात आल्याचे चित्र महासभेत आहे. विशेष समित्या विरोधकाकडे जाऊ नये म्हणून समित्याच्या निवडणुका उशिराने घेण्यात आल्या. विरोधी पक्षातील कॉग्रेस, राष्ट्वादी, साई पक्षात समन्वय नसल्यानेच शिवसेना-भाजपाने बाजी मारत ९ पैकी ७ समित्या स्वत:कडे राखण्यात यश मिळविले आहे.
पालिका आरोग्य परिक्षण व वैद्यकीय समितीच्या सभापती पदी कॉग्रेसच्या जया साधवानी, क्रीडा, समाजकल्याण, सांस्कृतिक समितीच्या सभापती पदी अपक्ष नगरसेवक सुजितकुमार चक्रवर्ती यांची निवड झाली. सेनेकडे शिक्षण समितीे, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणी पुरवठा, जलनि:स्सारण समिती, व महिला व बालकल्याण समिती असून विजय सुफाळे, सुरेश जाधव, ज्योती गायकवाड यांची सभापतीपदी निवड झाली आहे. (प्रतिनिधी)