ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:51+5:302021-04-26T04:36:51+5:30

कल्याण : ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने कोविड रुग्णालये सुरू करता येत नाहीत. कोविड रुग्णालये सुरू व्हावीत यासाठी कल्याणचे भाजप आमदार ...

One crore fund for setting up an oxygen plant | ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी एक कोटीचा निधी

ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी एक कोटीचा निधी

googlenewsNext

कल्याण : ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने कोविड रुग्णालये सुरू करता येत नाहीत. कोविड रुग्णालये सुरू व्हावीत यासाठी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी देण्याचे जाहीर केले आहे. तसेच, आपल्या मुलाचा लग्नसाेहळा साधेपणाने करून त्यातून बचत हाेणारा पैसा नागरिकांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रात सुमारे १७०० रुग्ण आढळत आहेत. उपचारांसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजन बेडची कमतरता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहे. कल्याण-डोंबिवलीत काही ठिकाणी कोविड रुग्णालये तयार होऊन सज्ज आहेत. त्यापैकी कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी येथे १०० बेडचे रुग्णालय सज्ज आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने नव्याने कोविड रुग्णालय सुरू करू नका, अशी ताकीद प्रशासनाला सरकारने दिली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता कल्याण पूर्वेचे आमदार गायकवाड यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी देण्याचे जाहीर केले आहे. तसेच, गायकवाड यांच्या मुलाचे ४ मे रोजी लग्न आहे. कोविड वाढल्याने हे लग्न अत्यंत साधेपणाने केले जाणार आहे. या लग्नासाठी जो खर्च येणार होता, त्याचे सर्व पैसे मतदारसंघातील नागरिकांच्या लसीकरणासाठी खर्च केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: One crore fund for setting up an oxygen plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.