मुंब्य्रात एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त
By admin | Published: May 18, 2017 07:00 AM2017-05-18T07:00:09+5:302017-05-18T07:00:09+5:30
चलनातून बाद झालेल्या तब्बल एक करोड रु पयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : चलनातून बाद झालेल्या तब्बल एक करोड रु पयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. भारतीय चलनातून बाद झालेल्या हजार आणि ५०० रु पयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी रेतीबंदर सर्कलजवळ
एक कार ताब्यात घेऊन तीमधील संदीप चिकनाहाल्ली (४९, रा.अहिंसा टॉवर, मालाड), अतुल सिंग (३४, रा. मीरा रोड) आणि सोनल रोजानी (२४, रा. मीरा रोड) या तिघांना अटक करून पोलिसांनी कारची तपासणी केली.
कारमध्ये एक हजार
रुपयांच्या पाच हजार तसेच
५०० रुपयांच्या १० हजार
नोटा आढळून आल्या. सदर रक्कम तसेच तीन लाखांची कार आणि ३० हजार रु पयांचे चार मोबाइल असा एकूण एक करोड तीन लाख ३० हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ निरीक्षक रवींद्र तायडे
यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याची माहिती तपास अधिकारी
सहायक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली.