खान्देशी महोत्सवात एक कोटीची उलाढाल
By admin | Published: April 26, 2017 11:46 PM2017-04-26T23:46:57+5:302017-04-26T23:46:57+5:30
खापरावरच्या पुरणपोळ््या, कळणीची भाकरी, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, पापड, कुरडई व अन्य कृषी उत्पादनांची एक कोटीहून
डोंबिवली : खापरावरच्या पुरणपोळ््या, कळणीची भाकरी, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, पापड, कुरडई व अन्य कृषी उत्पादनांची एक कोटीहून अधिक उलाढाल कल्याणमधील साई चौकात शनिवार आणि रविवारी झालेल्या या खान्देशी महोत्सवात झाली आहे. या दोन दिवसांत ४० हजार नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली. खान्देशातील खाद्य पदार्थांचे प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणावर ब्रॅ्रडिंग झाल्याचे आयोजक विकास पाटील यांनी सांगितले.
खान्देशी कला व संस्कृतीची ओळख करून देणारा रंगारंग कार्यक्रमही या वेळी झाला. खान्देशी खाद्य, कला व संस्कृती तसेच कृषी उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देशी विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरवण्यात आला होता. या महोत्सवाला ठाणे, मुंबई व नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील खान्देशी नागरिक उपस्थित होते. महोत्सवाचा सांगता समारंभ भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पाटील यांनी खास आहिराणी भाषेतून शुभेच्छा दिल्या. खान्देशी संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाची प्रशंसा करून बोलीभाषेचा महत्त्व सांगितले. या वेळी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे गटनेते वरुण पाटील, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पाटील, अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य सभापती कल्पना गुंजाळ, हेमलता पवार, उल्हासनगरमधील नगरसेविका ज्योती पाटील, एन. एम. भामरे, दीपक महाजन, संजय बिलाले, गणेश भामरे, सुभाष वानखेडे, जयवंत पाटील यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)