अंगणवाडी सेविकांसह एक कोटी कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:29+5:302021-09-24T04:47:29+5:30

ठाणे : राज्यासह देशभरातील २४ लाख अंगणवाडी कर्मचारी, ११ लाख आशा स्वयंसेविका, मनरेगा ग्रामसेवक, अर्धवेळ परिचर व मध्यान भोजन ...

One crore workers, including Anganwadi workers, went on a nationwide strike today | अंगणवाडी सेविकांसह एक कोटी कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप

अंगणवाडी सेविकांसह एक कोटी कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप

googlenewsNext

ठाणे : राज्यासह देशभरातील २४ लाख अंगणवाडी कर्मचारी, ११ लाख आशा स्वयंसेविका, मनरेगा ग्रामसेवक, अर्धवेळ परिचर व मध्यान भोजन कर्मचारी विविध योजनांचे एक कोटी कंत्राटी कर्मचारी २४ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या संपावर जात आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण अंगणवाडी सेविका, आशा, परिचारिका आदींचा समावेश आहे.

येथील शासकीय विश्रामगृहाजवळ सर्व कर्मचारी एकत्र येऊन शुक्रवारी निदर्शने करणार आहेत. या शासनाच्या विविध योजनांच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून शासन शासकीय कर्मचारी म्हणून मानले जात नाही. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाही. या योजनेत ७५ टक्के महिला कर्मचारी कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मनरेगा, सर्व शिक्षा अभियान या योजनांना कायम करावा, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक इत्यादी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. पेन्शन, ग्रॅच्युइटी, प्रोव्हिडंट फंडाचा लाभ देण्यात यावा. कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देईपर्यंत २१ हजार मासिक मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी देशातील एक कोटी योजना कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांकडून २४ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येत आहे, असे या कर्मचाऱ्यांच्या कृती समितीचे नेते ॲड. एम. एस. पाटील, भास्कर गव्हाळे, बृजपाल सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: One crore workers, including Anganwadi workers, went on a nationwide strike today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.