ठाण्यात संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्या ५६ जणांविरुद्ध एकाच दिवशी कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: April 3, 2020 12:00 AM2020-04-03T00:00:00+5:302020-04-03T00:00:01+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये १८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान मनाई आदेशाचा भंग करणारे, बनावटीकरण आणि अफवा पसरविणा-या २३६ जणांविरुद्ध कारवाई झाली. संचारबंदीचे आदेश मोडणा-या ५६ जणांविरुद्ध ठाणे शहर पोलिसांनी वेगवेगळया भागात मंगळवारी एकाच दिवशी कारवाई केली.

One-day action against six persons for violating the communication order in Thane | ठाण्यात संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्या ५६ जणांविरुद्ध एकाच दिवशी कारवाई

अफवा पसरविणा-या चौघांविरुद्ध कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे शहर पोलीस आयुक्तालयात १५ दिवसांमध्ये २३६ गुन्हेअफवा पसरविणा-या चौघांविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संचारबंदीचे आदेश मोडणा-या ५६ जणांविरुद्ध ठाणे शहर पोलिसांनी वेगवेगळया भागात मंगळवारी एकाच दिवशी कारवाई केली. दरम्यान, १ एप्रिल पासून रस्त्यावर वाहने आणणा-या अनेकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून यामध्ये अनेकांची वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये १८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान मनाई आदेशाचा भंग करणारे, बनावटीकरण आणि अफवा पसरविणाºया २३६ जणांविरुद्ध कारवाई झाली. ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करणारे २६, भिवंडीत २४, कल्याणमध्ये ११०, उल्हासनगरमध्ये ३५ आणि वागळे इस्टेटमध्ये ३२ अशा २२७ जणांविरुद्ध कारवाई झाली. भिवंडी आणि कल्याण या प्रत्येकी एक अशा दोन ठिकाणी पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल झाले आहेत. अफवा पसरविल्याप्रकरणी ठाणे, भिवंडी आणि कल्याणमध्ये प्रत्येकी तीन तर उल्हासनगरमध्ये तीन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत ठाणे आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी २७, कल्याणमध्ये ११२, उल्हासनगर ३८ तर वागळे इस्टेटमध्ये ३२ अशा २३६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत. तर ३१ मार्च रोजी एकाच दिवसांमध्ये ठाणे शहर आणि वागळे इस्टेटमध्ये १६, कल्याणमध्ये २६, उल्हासनगरमध्ये दहा तर भिवंडीमध्ये तीन अशा ५६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
१ एप्रिलपासून ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूकीला पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी उड्डाण पूलावरुन जाणा-या मार्गांसह अनेक रस्ते बॅरिकेटस् लावून सील केले आहेत. त्यामुळे केवळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºया नागरिकांनीही आता घरात राहणे पसंत केले आहे.
* कोणत्या ठिकाणी नाकाबंदी
ठाण्यातील तीन नाका येथील उड्डाणपूल, नितीन कंपनी उड्डाणपूल, नितीन कंपनी ते वंदना सिनेमाकडे जाणारा रस्ता, रघुनाथनगर, मुलूंड चेक नाका, वर्तकनगर कॅडबरी जंक्शन, रेमंड कंपनी अशा अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरश: लॉकडाऊन केले आहे.

Web Title: One-day action against six persons for violating the communication order in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.