ठाण्यात रंगणार एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:43 PM2018-02-20T16:43:31+5:302018-02-20T16:45:23+5:30
ठाण्यात एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल रंगणार आहे. रविवार ४ मार्च रोजी या फेस्टीवलचे आयोजन केले आहे.
ठाणे: किल्ले संवर्धन आणि जतन याची सुरु वात विस्मरणात जाऊ पहाणाºया किल्याला भेट आणि त्यावर एखादा कार्यक्रम करावा या विचाराने रविवार ४ मार्च रोजी घोडबंदर किल्ल्यावर ‘अश्वमेध घोडबंदर फेस्ट’ या एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अनुलोम, स्वत्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय या संस्थांच्यावतीने या फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन ते पाच यावेळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये इच्छुकांना विनामूल्य प्रवेश आहे. सायंकाळी सायकल रॅली आणि शोभायात्रेचे आयोजन व इतर कार्यक्र म होणार आहेत. ठाणे, वसई ,भाईंंदर, कल्याण, डोंबिवली परिसरातील लोकांना एक संपूर्ण रविवार कुटुंबासह घोडबंदर किल्ल्यावर घालविण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धांमध्ये नावनोंदणीची शेवटची तारीख २८ फेब्रूवारी आहे. आॅनलाईन फॉर्म भरून आपली नावे नोंदवू शकतात. स्पर्धांच्या अधिक माहिती साठी agbfest@gmail.com या ईमेलवर किंवा अर्चना कदम ९६१९७१३८५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शाहिर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बोधनकर, मंदार आणि प्रीती वाळुसकर, नृत्यांगना प्रज्ञा कोळी भगत अशा ३० हून अधिक नामवंत परिक्षकांचा सहभाग आहे.
स्पर्धा खालीलप्रमाणे
१. आॅन दी स्पॉट स्केचिंग आणि पेंटिंग स्पर्धा.
वयोगट ५ ते १० वर्षे आणि १० ते १४ वर्षे
विषय : किल्ला
१४ वर्षांवरील विद्यार्थी आणि व्यावसायिक ‘आॅन द स्पॉट लाइव स्केचिंग’ आणि पेंटिंग स्पर्धा.
२. लोक नृत्य आणि फ्यूजन लोकनृत्य स्पर्धा.
वयोगट १० ते १४ वर्षे आणि १४ वर्षांवरील
सोलो : वेळ ५ मिनिटे
गृप (५ ते १५ स्पर्धक ) वेळ १० मिनिटे
३. आॅन दी स्पॉट फोटोग्राफी स्पर्धा
वयोगट १६ वर्षावरील
४. पोवाडा गायन स्पर्धा.
वयोगट १० ते १४ वर्षे आणि १४ वर्षावरील
सोलो : वेळ ५ मिनिटे
गृप (३ ते ५ स्पर्धक) वेळ १० मिनिटे
५. किल्ला या विषयावर वक्तृत्व स्पर्धा.
वयोगट १० ते १४ वर्ष आणि १४ वर्षावरील
६. डिझाईनर्ससाठी आॅनलाईन डिझाईन आयडीया स्पर्धा आर्किटेक्चर , डीझाईन आणि आप्लाईड आर्टचे विद्यार्थी आणि व्यावसायिंकांसाठी.
पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना मुख्य कार्यक्र मात सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.