टेम्पो झाडाला आदळला; एकाचा मृत्यू तर 19 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:16 PM2019-07-21T13:16:03+5:302019-07-21T13:18:43+5:30

मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 19 कामगार जखमी झाले आहेत.

one dead and 21 injured in thane accident | टेम्पो झाडाला आदळला; एकाचा मृत्यू तर 19 जण जखमी

टेम्पो झाडाला आदळला; एकाचा मृत्यू तर 19 जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देमजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे.टेम्पो पलटी झाल्याने आलम शौकत शेख या मजुराचा मॄत्यू झाला आहे. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 19 कामगार जखमी झाले आहेत.

ठाणे - कळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने साकेत येथील झाडावर जावून आदळल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व मजुर मुंब्रा येथील रहिवाशी आहेत.
रविवारी सकाळी सव्वा 9 वाजेच्या सुमारास कळव्याहून साकेतमार्गे मुलुंडच्या दिशेनेे मजुरांना घेवून जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो रस्त्याच्या कडेला असणार्‍या झाडावर जावून आदळला. या घटनेत आलम शौकत शेख (25) या मजुराच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान, मृत्यु  झाला. तर, मोहम्मद शेख (26), अब्दुल करीम(25), हरुन शेख(19), शाहीद शेख (27), मोहम्मद ताज (19), मोहम्मद शेख (32), चांद अन्सारी (32), इकबाल सलिम शेख (26), इब्रान नाकोदा (39), आहत खान (30), निलान शेख (12), अदनान शेख, परवेज खान(20), मोहम्मद असिफ(19) आदी जखमींची नावे आहे. या जखमी मजुरांच्या डोक्याला, छातीला, हाताला, पायाला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यविकीत्सक डॉ. कैलकास पवार यांनी दिली. तसेच या घटनेतील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सर्जन डॉ. संदिप दरबस्तावर आणि डॉ. निशिकांत रोकडे परिसेविका सुनिता राऊत यांच्या पथकाने तात्काळ रुग्णांवर उपचार केले. तसेच ज्या रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआय करण्याची आवश्यक्ता आहे. अशा रुग्णांना इतर रुग्णालयात स्थालंतरीत केले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच या घटनेतील सर्व जखमी हे मुंब्रा येथील राहणारे असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्यतावतीने देण्यात आली. 
 दरम्यान, या घटनेत बचावलेल्या मजुराने दिलेल्या माहीती नुसार, दररोज मुंबईतील रस्त्यावरील झाडे कापण्यासाठी दररोज ठेकेदारामार्फत पाठवलेल्या वाहनाने आम्ही मुंब्रा येथून जात असतो.  त्यानुसार आज देखिल आम्ही कामसाठी निघालो, मात्र, आज क्षमतेपेक्षा अधिक मजूर या गाडीत होते. त्यामुळे साकेत येथे वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर जावून आदळली असल्याचे माहिती बचावलेल्या मजुराने दिली.
 

Web Title: one dead and 21 injured in thane accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.