उल्हासनगरातील वालधुनी नदीत पडून एक इसम गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 10:59 PM2017-10-07T22:59:46+5:302017-10-07T23:00:02+5:30
वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली.
उल्हासनगर - वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र असल्याने उद्या सकाळी शोध घेणार आहेत.
वडोलगावला जोडणारा वालधुनी पूल गेल्या वर्षी कोसळल्याने, पालिकेने नवीन पूल बांधणीला पालिकेने परवानगी दिली.
तसेच गावकऱ्यांसह शालेय मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा कच्चा पुल बांधला. पावसाळ्या पूर्वी नवीन पूल बांधण्याची अट होती. मात्र पुलाच्या सल्लागाराने पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. असा अहवाल पालिका आयुतांना दिल्यावर, तत्कालीन आयुक सुधाकर शिंदे यांनी सुरक्षाची उपाय म्हणून पुलाचे काम बंद केले. त्याच दरम्यान पावसाळ्यात नदीवर बांधलेला पूल वाहून गेला.
वडोलगावातील नागरिकांना 3 की.मी. चा वळसा घेउन शहरात यावे लागत असे. पालिकेने गावकरी व शालेय मुलांसाठी मोफत बससेवा चालू केली. मात्र गावकऱ्यांनी बस नको, पुलच हवा. अशी मागणी करून बस सेवा ठप्प पाडली. तसेच स्वखर्चाने व श्रमाने पुन्हा सिमेंटचा कच्चा पूल बांधला. त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू केली. तसेच अर्धवट पुलाचे काम सोमवार पासून सुरू झाले. यापूर्वी
पुला अभावी एक लहान मुलांचा पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर एक तरुणांचा गावात रेल्वे रुळावरून जात असताना अपघात होउन मूत्यू झाला आहे.
याप्रकाराने गावात पालिके बाबत संताप व्यक्त होत आहे. पुन्हा शनिवारी रात्री साडे नऊ वाजता एक इसम सिमेंटच्या पुलावरून जात असताना नदीत पडून वाहून गेला. त्याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी काहीवेळ घेतल्याची माहिती स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांनी दिली. अंधारामुळे अग्निशमन दलाचे जवान परत गेले असून सकाळी नदी पात्रात शोध घेणार आहेत.