अपघातात एक ठार
By Admin | Updated: June 4, 2016 01:34 IST2016-06-04T01:34:07+5:302016-06-04T01:34:07+5:30
भरधाव वेगाने वाहन चालवणे बदलापूरमधील दोन तरुणांना महागात पडले. गाडीवरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे

अपघातात एक ठार
बदलापूर : भरधाव वेगाने वाहन चालवणे बदलापूरमधील दोन तरुणांना महागात पडले. गाडीवरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बदलापूरमधील प्रस्तावित बदलापूर-पनवेल महामार्गावर हा अपघात झाला.
बदलापूर पूर्वेतील कात्रपपुढे असलेल्या मोकळ्या रस्त्यावर ही घटना घडली. हा रस्ता नेहमीच मोकळा असल्याने आणि हा रस्ता रुंद असल्याने अनेक वाहनचालक येथे गाडी शिकण्यासाठी येत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नवखे चालक वाहन शिकण्यासाठी आले होते.
शुक्र वारी दुपारी १ च्या सुमारास भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते गाडी इतक्या वेगात होती की, रस्त्याच्या खाली उतरल्यानंतर ती दोन ते तीन वेळा पलटली.
या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील दोन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)