उल्हासनगरात ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक जण जखमी

By सदानंद नाईक | Published: March 20, 2023 05:30 PM2023-03-20T17:30:29+5:302023-03-20T17:30:38+5:30

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहे. 

One killed, one injured in a collision with a truck in Ulhasnagar | उल्हासनगरात ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक जण जखमी

उल्हासनगरात ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक जण जखमी

googlenewsNext

उल्हासनगर - कॅम्प नं-१ मुरबाड रोडवरील वाहतूक पोलीस चौकी समोर रविवारी रात्री सव्वा बारा वाजता भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने, अकबर चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर अकबर अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहे. 

उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते मुरबाड रोड धोकादायक झाला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. रविवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान अकबर चौधरी व अकबर अब्दुल शेख हे दोघे मोटरसायकलने बिर्ला गेट मंदिराकडून शहाड फाटककडे जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात अकबर चौधरी हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अकबर अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उल्हासनगर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन, घटनेचा पंचनामा करीत मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालक विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed, one injured in a collision with a truck in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.