भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:33 PM2020-08-08T16:33:45+5:302020-08-08T16:38:22+5:30
यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
उल्हासनगर : कॅम्प नं-४ ओ टी सेक्शन येथील एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील ओ टी सेक्शन येथील एका नाष्ट्याच्या हॉटेलमध्ये आज दुपारी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. दुकानात लागलेल्या आगीमुळे मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून एका तासात आग आटोक्यात आणली. आगीत दुकानदार पप्पू गुप्ता याचे जागीच मृत्यू झाला असून दिनेश गुप्ता, मनोज जैस्वाल, लक्ष्मण, दुलारी, आशिष, राजकुमार प्रजापती व मगरू सोणकर असे सात जण जखमी झाले. जखमींना मध्यवर्ती रूग्णालयात उपचार साठी भरती करण्यात आले आहे. आगीत नाष्ट्या चे दुकान जाळून खाक झाले. तसेच शेजारी दुकानांनी आगीची झळ पोहचली आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दुकानातून दोन सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा