ठाण्यात महिलेला एक लाख १९ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:50+5:302021-06-04T04:30:50+5:30
ठाणे: बँकेच्या एटीएम कार्डची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय विवाहितेची एक लाख १९ ...
ठाणे: बँकेच्या एटीएम कार्डची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय विवाहितेची एक लाख १९ हजारांची फसवणूक झाल्याची घटना अलीकडेच घडली. बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
ग्रीनवूड कॉम्पलेक्स, हाईडपार्कमध्ये राहणारी ही महिला १८ मे २०२१ रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घरी असतांना तिच्या मोबाईल क्रमांकावर एका महिलेने कॉल केला. बोलण्याच्या ओघात तिचा विश्वास संपादन करुन एटीएम कार्डची केवायसी अपडेट करायची आहे, अशी बतावणी केली. तिच्याकडून कार्डची माहिती घेतल्यानंतर तिच्या एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे अनुक्रमे ९९ हजार आणि २० हजार रुपये ऑनलाईन बँक खात्यातून वळती केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ जून रोजी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे अधिक तपास करीत आहेत.
..........
वाचली