बनावट धनादेशाद्वारे धान्य खरेदी करुन मुंबईच्या व्यापाऱ्याची एक लाख २१ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:51 PM2020-09-17T23:51:26+5:302020-09-17T23:53:41+5:30
दुकानासाठी धान्याची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख २१ हजारांची फसवणूक करणाºया भरत निमावंत ( रा. ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दुकानासाठी धान्याची गरज असल्याची बतावणी करीत धान्याची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख २१ हजारांची फसवणूक करणाºया भरत निमावंत (४६, रा. शिवाईनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून हे सर्व धान्य जप्त करण्यात आले आहेत.
भरत निमावंत आणि त्याच्या साथीदाराने २४ आॅगस्ट २०२० रोजी मुंबईतील वरळी येथील व्यापारी रवींद्र श्रीपुरम यांना गहू, तुरडाळ, तांदूळ आणि मूगडाळीची आॅर्डर दिली. हे सर्व एक लाख २१ हजारांचे धान्य त्याने ठाण्यातील माजीवडा येथे मागविले. ठरल्याप्रमाणे या व्यापाºयाने माजीवडा येथे हे सर्व धान्य पाठविले. मात्र, याबदल्यात निमावंत याने या व्यापाºयाला दूसºयाच्याच नावाचा बनावट धनादेश दिला. या व्यापाºयाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील जोगेश्वरी येथील व्यापारी श्यामभुवन विश्वकर्मा (३६) यांना जैन मंदिरासाठी सिलिंग फॅन लागणार असल्याचीही त्याने बतावणी करीत त्यांना ७६ सिलिंग फॅनची आॅर्डरही दिली. या आॅर्डरचीही डिलिव्हरी त्याने ठाण्यातील कापूरबावडी नाका येथे २५ आणि २६ जुलै रोजी केली. त्याबदल्यात विश्वकर्मा यांनाही रोख पैसे देण्याऐवजी दुस-याच्या नावाचे बनावट एक लाख १९ हजारांचे धनादेश दिले. याबाबत ९ सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. याच प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने भरत याला शिवाईनगर येथून ९ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान भरतने वरळीतील श्रीपुरम या व्यापाºयाचीही फसवणूक केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून आता हे धान्यही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.