म्हसा यात्रेत बैलजोडी एक लाख ८० हजारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:43 AM2018-01-06T06:43:46+5:302018-01-06T06:43:52+5:30
भाविकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या म्हसा यात्रेतील बैलबाजारदेखील तेवढाच प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात एक जोडी विक्र मी किमतीला विकली गेली असून हे बैल पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांचे आहेत. या बैलजोडीची किंमत एक लाख ८० हजार एवढी आहे.
मुरबाड - भाविकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या म्हसा यात्रेतील बैलबाजारदेखील तेवढाच प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात एक जोडी विक्र मी किमतीला विकली गेली असून हे बैल पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांचे आहेत. या बैलजोडीची किंमत एक लाख ८० हजार एवढी आहे.
म्हसा येथे खांबलिंगेश्वराची यात्रा २ जानेवारीपासून सुरू झाली. ती बैलांच्या खरेदीविक्रीसाठीही प्रसिद्ध आहे. यात्रेत काळे खिलार, मैसूर खिलार, गावरान खिलार या प्रकारांतील बैल विक्रीसाठी येत असतात. साधारणपणे एका बैलाची किंमत लाखापर्यंत असते, तर जोडीची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत असते. यंदाही तोच ट्रेण्ड कायम ठेवत म्हसा यात्रेत सर्वाधिक किमतीला बैलजोडी विकली गेली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांनी विविध जातींचे बैल विक्र ीसाठी आणले होते. खिलार जातीच्या या जोडीची मूळ किंमत दोन लाख रु पये होती. परंतु, त्यांनी ही बैलजोडी एक लाख ८० हजार रु पयांना विकली. देवराम लांडे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. लांडे यांना खिलार बैल पाळण्याचा छंद असून ते दरवर्षी म्हसा यात्रेत येतात.
बैल आणि म्हशी अधिक
यंदा म्हसा यात्रेत केवळ बैल आणि म्हशीच विक्रीसाठी आल्याचे पशुधन अधिकारी डॉक्टर दिलीप धानके यांनी सांगितले. येथे विकलेल्या म्हशीची सर्वाधिक किंमत ६० हजार असल्याचेही ते म्हणाले. दरवर्षीपेक्षा यंदा बाजारात कमी गुरे आल्याचे त्यांनी सांगितले.