महिला दिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे एक लाखांची ठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:14+5:302021-03-09T04:44:14+5:30

उल्हासनगर : जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींना ठेव स्वरूपात एक लाख रुपये देण्याचा अनोखा उपक्रम महापालिकेने राबविल्याची माहिती महापौर ...

One lakh deposit in the name of girls born on Women's Day | महिला दिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे एक लाखांची ठेव

महिला दिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे एक लाखांची ठेव

Next

उल्हासनगर : जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींना ठेव स्वरूपात एक लाख रुपये देण्याचा अनोखा उपक्रम महापालिकेने राबविल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

तरण तलाव येथील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेतर्फे महिला जन्मदिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे बचत ठेव म्हणून एक लाख रुपये ठेवण्यात येणार आहे. यासाठी शहरातील रुग्णालयांना साेमवार, ८ मार्चला जन्मलेल्या मुलींची नावे महापालिका आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन महापौरांनी केले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे यांच्यावर जबाबदारी हाेती. महिला दिनाच्या कार्यक्रमात आज जन्मलेल्या मुलींची माहिती देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव करण्यात आल्याची माहिती नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा गौरव पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात केला. यावेळी पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री, पक्षाच्या शहराध्यक्ष किरण कौर धामी, नगरसेविका सुनीता बगाडे, माधव बगाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रा. सुरेश सोनावणे, शहर संघटक प्रकाश शिरसाट यांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विकास मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मंजूषा कांबळे व आपली स्वतःची तीन एकर शेती व घर बुद्ध विहारास दान करणाऱ्या सुनंदा तायडे यांचा सत्कार केला. भाजप, काँग्रेस, मनसे या पक्षांनीही महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Web Title: One lakh deposit in the name of girls born on Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.