एलएसडी पेपरप्रकरणी एक; अटकेत ठाणे पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 12:47 AM2019-12-08T00:47:21+5:302019-12-08T00:47:27+5:30

आरोपींची संख्या झाली पाच, कारही हस्तगत

One on LSD paper; Thane police performance in detention | एलएसडी पेपरप्रकरणी एक; अटकेत ठाणे पोलिसांची कामगिरी

एलएसडी पेपरप्रकरणी एक; अटकेत ठाणे पोलिसांची कामगिरी

Next

ठाणे : शहर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पकडलेल्या एलएसडी पेपर या अमली पदार्थप्रकरणी आणखी एकाला अटक केली. त्याच्याकडून ४७ लाख ७० हजार रुपये किमतीचा ९५४ ग्रॅम एलएसडी पेपर हा अमली पदार्थ व इतर ऐवज असा एकूण ५१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणे शहर पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मिळालेल्या माहितीनुसार १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मुंबई, मुलुंड येथील सलमान नवाब अली शेख (२८), नवी मुंबई, नेरूळच्या संजीव ऊर्फ पॉल रामाध्याय चौहान (२७), नवी मुंबई उलवेगावमधील नितीन मारुती लामतुरे (३३) आणि कळंबोलीच्या सुशांत संभाजी रसाळ (३२) अशा चौघांना वेगवेगळ्या प्रकारे अटक करून त्यांच्याकडून त्यावेळी ११ लाख ६१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

दरम्यान, या आरोपींच्या चौकशीत आणखी एक नाव पुढे आल्यावर नवी मुंबई नेरूळ येथील प्रेम राजप्पन अय्यर याला २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून मात्र त्या चौघांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

अय्यर याच्याकडून ९५४ ग्रॅम एलएसडी पेपर, मोबाइल फोन, ह्युंदाई कंपनीची आय टष्ट्वेंटी कार असा एकूण ५१ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार करत आहेत.

आरोपींकडून ६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आतापर्यंत या प्रकरणातील पाच आरोपींकडून १०६३ एलएसडी पेपर (अमली पदार्थ), ५८ ग्रॅम मेफेड्रॉन पावडर, ६.४ ग्रॅम चरस व इतर वस्तू असा ६२ लाख ८१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, आरोपी अंमली पदार्थ कोणाकडून विकत घ्यायचे, या मुद्यांवर तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी सांगितले.

Web Title: One on LSD paper; Thane police performance in detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.