ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर
By अजित मांडके | Published: September 5, 2022 04:42 PM2022-09-05T16:42:20+5:302022-09-05T16:42:43+5:30
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. मृतांची संख्या पोहचली १५ वर
अजित मांडके
ठाणे : कोरोनापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात आता आणखी एका मृत्युची भर पडली आहे. ठाणे शहरातील रुग्णाचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लु रुग्णांच्या मृत्युंची संख्या आता १५ वर पोहचली आहे. आरोग्य यंत्रणा स्वाईन फ्लुला आळा घालण्यासाठी सचोटीचे प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे ४९६ रुग्ण झाले आहेत.
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. दुसरीकडे स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या देखील मागील काही दिवसापासून पुन्हा वाढतांना दिसू लागली आहे. जिल्ह्यात आतार्पयत ४९६ रुग्ण आढळले असून त्यात १५ जणांचा मृत्यु झाला आहे. पैकी ३६२ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, ११९ रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे जिल्ह्यात रु ग्ण संख्येबरोबरच मृत्युच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत असून यामुळे जिल्ह्याची आरोग्य चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक रु ग्ण आढळून येत आहेत. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरात रु ग्ण आढळून येत आहेत. रु ग्ण संख्येबरोबरच मृत्युच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे जिल्ह्याची आरोग्य चिंता वाढली आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात दहा दिवसांपुर्वी स्वाइन फ्लूच्या रु ग्णांची संख्या ४२२ होती. त्यात ठाणे ३०८, कल्याण-डोंबिवली ५६, नवी मुंबई ३६, मीरा-भाईंदर ६, बदलापूर ८, ठाणे ग्रामीण चार आणि अंबरनाथमधील एक रुग्ण होते. तर, ठाणे ८, कल्याण-डोंबिवली ५ आणि अंबरनाथ १ असा एकूण १४ मृत्युची संख्या होती. परंतु गेल्या दिवसांत रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४९६ वर पोहचली आहे. त्यात ठाणे ३६१, कल्याण-डोंबिवली ७१, नवी मुंबई ४१, मीरा-भाईंदर ६, बदलापूर ९, भिवंडी ३, ठाणे ग्रामीण चार आणि अंबरनाथमधील एक रुग्ण आहे. मृतांची संख्या १५ वर पोहचली असून त्यात ठाणे ९, कल्याण-डोंबिवली ५ आणि अंबरनाथ १ मृताचा समावेश आहे.