सज्जा पडून एक जण जखमी; ठाण्यातील पंचरत्न चाळीतील घटना
By अजित मांडके | Published: June 27, 2023 04:35 PM2023-06-27T16:35:32+5:302023-06-27T16:35:49+5:30
पंचरत्न चाळी ही २५ वर्ष जुनी आहे. त्या चाळीत १२ घरे तळ अधिक एक मजली असून समोरासमोर घरे आहेत.
ठाणे : समता नगर, राजीव गांधी कंपाउंड येथील पंचरत्न चाळीतील सहा घरांचा सज्जा पडल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये सुरेश वाल्मिकी (३३) व्यक्ती जखमी झाला आहे. सुरेश हे ज्यावेळी सज्जा पडला त्यावेळी ते सज्जावर उभे होते. यामध्ये त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. तर उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असून तो काढण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.
पंचरत्न चाळी ही २५ वर्ष जुनी आहे. त्या चाळीत १२ घरे तळ अधिक एक मजली असून समोरासमोर घरे आहेत. त्यापैकी सहा घरांचा सज्जा अचानक दुपारी कोसळला. हा सज्जा अंदाजे ५० फूट लांब ४ फूट रुंद इतका आहे. या घटनेची माहिती सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी -कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान,अतिक्रमण विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने तो भाग काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाचे जवान व अतिक्रमण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.