ई-पीक पाहणीत एक हजार ८१२ शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:01+5:302021-09-09T04:48:01+5:30

ठाणे : जिल्ह्यातील शेतपिकांची आता ई-पीक पाहणी सुरू आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ८१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ...

One thousand 812 farmers registered in e-crop survey | ई-पीक पाहणीत एक हजार ८१२ शेतकऱ्यांची नोंदणी

ई-पीक पाहणीत एक हजार ८१२ शेतकऱ्यांची नोंदणी

Next

ठाणे : जिल्ह्यातील शेतपिकांची आता ई-पीक पाहणी सुरू आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ८१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

-----

* ॲक्टिव्ह- १३५८

* इनॲक्टिव्ह - १७९

_--------

प्रतिक्रिया -

ई-पीक पाहणीसाठी आतापर्यंत एक हजार ८१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संभाव्य संकटांवर मात करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या नोंदणीसाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधून आवश्यक ती माहिती घ्यावी.

- अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे

-------

महसूल विभागाने १५ ऑगस्टपासून सुरू केलेला ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवायला घेतलेला आहे. हा निर्णय नक्कीच खूप चांगला आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने याचा फारसा फायदा होईल, असे वाटत नाही. शिवाय प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाइल असतोच असेही नाही. असला तर तो वापरता येईल, असे नाही.

- जगन्नाथ विशे, बळेगाव, मुरबाड.

----------

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. पीकपाहणी नोंदविण्यातील बनावटगिरीमुळे अनेक महसूली व दिवाणी दावे उद्भवलेले आहेत. शिवाय महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी इत्यादी कर्मचारी अनेकवेळा प्रत्यक्ष बांधावर व शिवारात जाऊन पीकपाहणी नोंदणी करणे अपेक्षित असतांना तसे फारसे या आधी झाले नाही. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सहभागातून ई-पीक पेरा नोंदणी करणे सुलभ करणे गरजेचे झाले. या ॲपद्वारे शेतजमिनीवरील पिकांची नोंद, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर, चक्रीवादळे यामुळे विषम परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अचूक अंदाज व त्यावरून योग्य व वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई देणे सरकारला शक्य होईल. याशिवाय प्रदेशनिहाय पिकांखालील क्षेत्र आणि पिकाच्या जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी याचा फायदा होऊ शकेल. पण त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

ॲड. राजकुमार पाटील, मुरबाड, संचालक, महाराष्ट्र राज्य डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे

---------------

तालुका- रजिस्ट्रेशन- ॲक्टिव्ह- इनॲक्टिव्ह-

अंबरनाथ- १३०- १०९- २१

कल्याण- ५६-. ४८- ०८

ठाणे- २८ - २६- ०२

भिवंडी- ४२५- ३७५- ५०

मुरबाड- ३१९- २८८- ३१

शहापूर- ५७९- ५१२ - ६७

Web Title: One thousand 812 farmers registered in e-crop survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.