एक हजार हेक्टरएवेजी केवळ शंभर हेक्टरवर फळझाड लागवड; शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:47 PM2018-03-04T16:47:25+5:302018-03-04T16:47:25+5:30
मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांनी निदर्शनात आणून दिली
ठाणे : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) उपक्रमाखाली मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांनी निदर्शनात आणून दिली आहेत.
नरेगाव्दारे शेती उपयुक्त विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना नरेगाकार्यालयाकडून सुयोग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. यासाठी इच्छुक शेतकरी ठाणे जिल्हा परिषदेच्या नरेगा कार्यालयास भेट देतात. मात्र शेती संबंधीच्या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी कृषी अधिकारी वेळोवेळी गैरहजर असल्याचे निदर्शनात आले आहेत. यामुळे मागील वर्षाच्या सुमारे एक हजार हेक्टरवरील फळबाग लागवडीसह रोप वाटीका व वृक्ष लागवडीचा लाभ शेतकºयाना घेता आली नसल्याची खंत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
नरेगाव्दारे यंदाही शेतक-यांच्या हिताचे सुमारे एक हजार ६७४ फळबाग लागवडीच्या कामास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. या कामासह ४०८ वृक्ष लागवडीचे आणि दीडशे रोपवाटीकांची काम करण्यास जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. लाखो रूपयांची ही काम कृषी अधिका-यांमार्फत जिल्ह्यात राबवणे अपेक्षित आहे. या दुर्लक्षितपणा विरोधात जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीनी वेळीच लक्ष केंद्रीत करून शेतक-यांना नरेगाच्या योजनेचा शंभरटक्के लाभ मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.