तीनपैकी एक अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह दोन निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:21+5:302021-04-21T04:40:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्राः येथील अमृतनगरातील एका रिक्षाचालकाने एकाच दिवशी ठराविक अंतराने केलेल्या तीन अँटिजेन टेस्टपैकी एक पॉझिटिव्ह आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः येथील अमृतनगरातील एका रिक्षाचालकाने एकाच दिवशी ठराविक अंतराने केलेल्या तीन अँटिजेन टेस्टपैकी एक पॉझिटिव्ह आली असून, दोन निगेटिव्ह आल्या आहेत. यामुळे तो संभ्रमित झाला आहे. याप्रकारामुळे अँटिजन टेस्टच्या खात्रीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ज्या रिक्षाचालकाच्या बाबत ही घटना घडली आहे, त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे काही चाचण्या करण्यासाठी दाम्पत्य कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेले होते. तेथे दोघांची अँटिजेन टेस्टही करण्यात आली. यात पत्नीची निगेटिव्ह तर पतीची (रिक्षाचालक) टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामुळे त्याने त्याची पुन्हा टेस्ट करण्याची इच्छा तेथील कर्मचाऱ्यांकडे व्यक्त केली. ती अमान्य करण्यात आली. यामुळे त्याने मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सुरू असलेल्या टेस्टच्या ठिकाणी पुन्हा दोनवेळा टेस्ट केल्या त्या दोन्ही निगेटिव्ह आल्याचा दावा त्याने केला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.